Ladki bahan Yojana new rules: मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारची माझी लाडकी बहीण ही योजना महत्त्वाकांशी बनलेली आहे आणि योजनेमध्ये नुकतेच काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत. तर या योजनेअंतर्गत महिलांना दर महिना 2100 रुपये देण्याची घोषणा या महाराष्ट्र राज्य सरकारने केलेली असली, तरी या नवीन निकषांमुळे अनेक महिला या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता यामध्ये निर्माण झालेली आहे. तर मित्रांनो या योजनेबद्दलची सविस्तर माहिती आपण यामध्ये जाणून घेऊया.Ladki bahan Yojana new rules:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्याची एक महत्वकांशी योजना बनली आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर आतापर्यंत 5 हप्त्यांचे पैसे म्हणजे जवळपास साडेसात हजार रुपये हे जमा करण्यात आलेले आहेत, आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देण्याची घोषणा आता केलेली आहे.
आणि या योजनेमध्ये एक महत्त्वाचा निकष लागू करण्यात आलेला आहे. ज्या महिला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत आहेत, अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ हा दिला जाणार नाही, आणि हा निर्णय सिस्टीम द्वारे लागू करण्यात आला असल्यामुळे मोठ्या संख्येने महिला या योजनेपासून आता वंचित राहणार आहेत.Ladki bahan Yojana new rules
या योजनेची व्यवस्था आणि पडताळणी.
या योजनेच्या लाभार्थी महिला आपला आयडी व पासवर्डचा वापर करून योजनेचे स्टेटस पाहू शकतात. सिस्टीम मध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ‘यश’ असे दर्शविले जात जाईल. तर इतरांसाठी ‘नो’ असे दर्शवले जाईल ज्या महिलांसमोर ‘यश’ असे दर्शवले जाईल त्या महिला या योजनेपासून वंचित राहणार आहेत.
आता भविष्यातील परिणाम असे आहेत की, या नवीन निकषांमुळे अनेक गरजू महिलांवर प्रतिकूल परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. व विशेष म्हणजे ज्या महिलांना दोन्ही योजनांची गरज आहे त्यांना आता एकाच योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या मासिक उत्पन्नावर देखील परिणाम होऊ शकतो.
या परिस्थितीत प्रभावित महिलांनी पुढील पर्यायांचा विचार करणे आवश्यक आहे.
- दोन्ही योजनांमधून मिळणाऱ्या लाभांची तुलना करून घेणे.
- स्थानिक प्रशासनाकडून मार्गदर्शन घेणे.
- इतर उपलब्ध शासकीय योजनांची माहिती घेणे.
- आवश्यक कागदपत्रांची पूर्तता उपलब्ध करणे.
- सरकारी पातळीवरील अपेक्षा काय आहेत?
- प्रभावित महिलांसाठी पर्यायी योजना
- निकषांमध्ये सुधारणा आणणे.
- विशेष परिस्थितींसाठी अपवाद
पारदर्शक व सुलभ प्रक्रिया
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील नवीन बदल महत्त्वपूर्ण असले, तरी या योजनेमुळे अनेक महिलांना लाभ हा दिला जाणार नाही. या परिस्थितीत सरकारने प्रभावित महिलांसाठी पर्यायी उपाय योजना करणे गरजेचे आहे. व तसेच महिलांनी आपल्या उपलब्ध असलेल्या इतर योजनांची माहिती घेऊन योग्य तो निर्णय हाती घेणे महत्त्वाचे आहे.