Modi Awas Gharkul Yojana | सरकारद्वारे नागरिकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी व त्यांना घरे व शिक्षण मिळवण्यासाठी अनेक अशा लोककल्याणकारी योजना राबवले जात आहेत. अशीच एक केंद्र सरकार द्वारे योजना राबवली जाते. ती म्हणजे मोदी आवाज घरकुल योजना, मोदी घरकुल आवास योजना अंतर्गत इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त जाती व भटक्या जमाती या दहा लाख लाभार्थ्यांना येतात तीन वर्षांमध्ये घरकुल चा लाभ देण्यात येणार आहे या योजनेचा प्रारंभ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये यवतमाळ येथे 28 रोजी होणार आहे.
हे पण वाचा | तुरीच्या दरात मोठी घसरण आजचा बाजार भाव पहा
आर्थिक वर्ष 2023-24 ते 2025+26 यादरम्यान एकूण दहा लाख गरिबांच्या उद्दिष्ट सरकारने ठरवलेला आहे. म्हणजे सण २०२३२४ मध्ये मंजूर तीन लाख घरकुल लाभार्थ्यांपैकी दोन लाख पन्नास लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या हप्त्याच्या 375 कोटी रुपयांच्या निधी वितरण होणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात केंद्र सरकार पुरस्कृत पंतप्रधान आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध ग्रामीण गृह निर्माण योजनेच्या माध्यमातून 17,00,728 घरांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे तसेच 7,03,497 घरांचे कामे प्रगतीपथावर आहे.
सरकारचे ध्येय सर्वांसाठी घरे व राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या कामात गतिमान व गुणवत्ता आणण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या महाआभास अभियान 2023 24 अंतर्गत राज्यातील सात लाख घरे पूर्ण करण्यात येणार असे सांगण्यात येत आहे.
हे पण वाचा | या राज्यात शेतकऱ्यांची दोन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ राज्य सरकारची घोषणा
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वे मार्ग व रस्ते कामांचा लोकार्पण होणार आहे राज्यातील दळणवळण अधिक गतिमान करण्यासाठी रेल्वे मार्ग व रस्ते प्रकल्पांचे कामे सुरू होणार आहेत. राज्यातील वर्धा नांदेड या नवीन रेल्वे मार्गावरील 625 कोटी रुपये खर्च च्या वर्धा ते कळम या 39 किमी लांबीचा रेल्वे मार्ग व अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गावरील 625 कोटी रुपये खर्च आलेला न्यू आष्टी ते अंमळनेर 32.84 किमी लांबीचा रेल्वे मार्ग लोकार्पण माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठवले रोजी यवतमाळ येथे होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
व वर्धा- कळम रेल्वे स्टेशन पर्यंत नवीन रेल्वेचा व अमळनेर ते न्यू आष्टी रेल्वे स्थानकापर्यंतचा विस्तार डेमो रेल्वे सेवेचा आरंभ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात येणार आहे.