Panjab Dakh News : ज्येष्ठ हवामान अभ्यासाक पंजाबराव यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अंदाज वर्तलेला आहे. या अंदाजामध्ये राज्यातील येत्या काळात हवामान अंदाज कसे राहणार याची माहिती दिलेली आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Panjab Dakh News
खरे तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. मध्यंतरी राज्यांमध्ये पावसाचे वातावरण तयार झाले होते व काही ठिकाणी चांगल्या प्रकारचा पाऊस झालेला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या हवामानामध्ये बदल झालेला होता. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान तयार झाले होते. तर काही ठिकाणी पाऊस देखील झालेला आहे.
पंजाबराव यांनी त्यांच्या हवामान अंदाज मध्ये राज्यात दहा डिसेंबर पासून कडाक्याची थंडीला सुरुवात होणार असा अंदाज वर्तवला आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांचे कांदा काढणी बाकी असेल त्यांनी काढणी करून घ्यावी असे पंजाब डख म्हटले आहे. राज्यात आता पुढील काही दिवस पाऊस पडणार नाही असे देखील त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
परंतु या वेळेस बोलत असताना ते म्हटले की, ज्यांना तिरुपतीला जायचं आहे. त्यांनी 14 13 तारखेला जाऊ नये कारण या काळात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिरुपती आणि तामिळनाडूमध्ये 17 ते 19 तारखेचा दरम्यान पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
राज्यामध्ये उद्यापासून हवामान कोरडे राहणार आहे. आणि थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात उद्यापासून थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी पंजाबराव यांचा हा हवामान अंदाज लक्षात घेऊन त्यांच्या शेती पिकांची व्यवस्थित प्रकारे नियोजन करायचे आहे.