तुम्हाला माहित आहे का? "उद्या पाऊस पडणार" हे हवामान खातं आकाशाकडे बघून सांगत नाही त्यामागे उपग्रह, रडार आणि सुपर कॉम्प्युटरचं मोठं शास्त्र दडलेलं आहे!
हवामान खात्याचं सर्वात महत्त्वाचं हत्यार म्हणजे डॉप्लर वेदर रडार. जमिनीवरून आकाशाच्या दिशेने सोडलेल्या लहरी ढगांवर आदळून परत येतात, आणि त्याच्या अभ्यासातून ढगांत किती पाणी साचलंय हे कळतं.
हवामान खात्याचे अनेक उपग्रह अंतराळातून सतत पृथ्वीची छायाचित्रं टिपत असतात. यामुळे आकाशात नेमके कुठे आणि किती ढग जमा झालेत, हे स्पष्ट दिसतं.
जमिनीवरच्या रडार-उपग्रहांसोबतच एअर बलून आणि विमानांमार्फतही उंचावरचं तापमान, वारा आणि आर्द्रता यांची माहिती सतत गोळा केली जाते.
समुद्रात बसवलेले खास सेन्सर्स पाण्याचं पृष्ठभागीय तापमान, लाटा आणि सागरी प्रवाह मोजतात — कारण समुद्रातल्या बदलांवरूनच पुढचा पाऊस, वादळं ठरतात.
सुरडार, उपग्रह आणि सेन्सर्समधून मिळालेला हा प्रचंड डेटा शक्तिशाली सुपर कॉम्प्युटरमध्ये टाकला जातो. आजचा आणि आधीच्या वर्षांचा हवामान डेटा एकत्र अभ्यासून मगच अंदाज तयार होतो.
हा सगळा डेटा गोळा करून त्याचा तासन्तास अभ्यास केल्यानंतरच हवामान खातं पुढच्या काही तासांचा किंवा दिवसांचा अंदाज अधिकृतपणे जाहीर करतं.
१५ जानेवारी १८७५ रोजी कोलकात्यात स्थापन झालेल्या भारतीय हवामान विभागाला आता १५० वर्षं पूर्ण झाली आहेत आणि पुढच्या काही वर्षांत तीन दिवसांचा अंदाज १०० टक्के अचूक करण्याचं उद्दिष्ट आहे.