दिल्ली NCR सह देशभरात नवीन वर्षापूर्वी हवामानात बदल झालेला आहे. शुक्रवारी संपूर्ण दिल्ली एनसीआर मध्ये जोरदार पाऊस झाला आणि तापमान 10 अंशापेक्षा खाली गेले. हवामान खात्याने आजही पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे
हवामान खात्याने दिलेल्या अंदाज मध्ये आज ही दिल्ली- एन सी आर मध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे
पंजाब, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, इत्यादी उत्तर भारतीय राज्यांमध्ये हलका पाऊस आणि थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील हवामानासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचा अर्थ म्हणजे हलका पाऊस, वादळ आणि कधी कधी धुके पडण्याची शक्यता आहे
वेस्टर्न डिस्टर्बन्समधील गडबडीमुळे पर्वतांवर सतत बर्फवृष्टी होत आहे, ज्याचा थेट परिणाम दिल्ली-एनसीआरमध्ये दिसून येत आहे. पर्वतीय भागांमधील बर्फवृष्टीचे प्रमाण जास्त असल्यामुळे दिल्लीतही थंडीची लाट येत आहे
नवीन वर्षाच्या 1 जानेवारीला, दिल्लीचे कमाल तापमान 20 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे थोडासा उबदार अनुभव मिळू शकतो, पण धुके आणि थंडी अद्याप कायम राहण्याची शक्यता आहे.