Onion Market 16 October 2025 | राज्यामध्ये सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि अशातच बाजारातून एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. सध्या मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचे आवक होत आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून बाजारात दर कमी होत आहेत. काल सरासरी दर 1060 रुपये मिळाला, तर आज थेट 16 ऑक्टोबर रोजी किंचित घसरल झाले असून १०५० रुपये प्रति क्विंटल इतका झाला आहे. या दरातील चढउतारामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा असतील तर निर्माण झाले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात सणासुदीच्या काळामध्ये पाणी आले आहे. काही शेतकरी बांधव म्हणतात की आम्ही केलेला खर्च देखील निघत नाही. Onion Market 16 October 2025
आज राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये मिळून तब्बल दीड लाख क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. यामध्ये नाशिक जिल्हा आघाडीवर असून, एकट्या नाशिकमध्येच सुमारे एक लाख क्विंटल कांदा आला आहे. उन्हाळी कांद्याला सरासरी 972 रुपये दर मिळाला, तर नागपूर जिल्ह्यात तो 1400 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचला.
त्याचवेळी पांढऱ्या कांद्याला भावही चांगला आहे, सरासरी 1875 रुपये, आणि लाल कांद्याला सुमारे 1375 रुपये दर मिळाला. लोकल कांद्याची किंमत देखील काही ठिकाणी कमी झाली आहे. म्हणजे सध्या बाजारात दरात कुठेही वाढ नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये येणाऱ्या पैसा हा समाधानकारक नाही असे चित्र आहे. कारण शेतीला केलेला खर्च देखील निघत नाही.
धुळे जिल्ह्यात लाल कांद्याला नऊशे रुपये, अमरावती जिल्ह्यात लोकल कांद्याला तब्बल दोन हजार रुपये इतका दर मिळाला आहे. मुंबई बाजारात सर्वसाधारण अकराशे पन्नास रुपये, तर पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याला 1075 रुपये, सर्वसाधारण कांद्याला ११५० रुपये आणि नंबर एकच्या कांद्याला बाराशे रुपये दर नोंदवला गेला आहे.
राज्यातील बाजार समितीमधील स्थिती:
अकलूज मध्ये 355 क्विंटल आवक झाली असून दर दोनशे रुपये ते 1600 रुपये दरम्यान होते. कोल्हापूर बाजारात 3773 क्विंटल आवक झाले आणि दर 400 ते 1800 रुपये पर्यंत गेले. अकोल्यात देखील भाव 600 ते 1600 रुपये पर्यंत आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये कांद्याचे दर 150 ते 1150 रुपयापर्यंत आहे.
मुंबईच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये आठशे क्विंटल आवक झाली आहे. आणि ते सर्वसाधारण ११५० रुपये दर मिळाला आहे तर शिरूर, खेड, सातारा, कराड या ठिकाणी कांद्याचे भाव 1000 ते 1800 रुपये दरम्यान आहेत. धुळे, जळगाव, धाराशिव, नागपूर, अमरावती, सांगली, पुणे, पिंपरी, वाई आणि मंगळवेढा बाजारांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांचा प्रश्न दर वाढतील का?
कांद्याचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांमधून सातत्याने एकच प्रश्न विचारला जात आहे. भाव वाढतील का? परंतु आता हे सांगणे देखील अवघड झाल आहे. शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक मोठा खर्च करावा लागत आहे. मजुरी, खत, वाहतु खर्च पण भाव अजून देखील वाढलेले नाहीत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवल्यामुळे सडत आहे बाजारात नेऊन दरही परवडत नाही. आता यापुढे काय करावा असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
काही तज्ञांच्या मते ऑक्टोबर पासून बाजारात नवीन कांद्याची मोठी आवक होईल. त्यामुळे तर आणखी घसरण्याची शक्यता आहे. मात्र त्याच वेळी जर पाऊस वाढला आणि कांदा साडू लागला, तर उलट दर वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे सध्या परिस्थिती अनिश्चित आहे.
सरकारकडून काही उपयोजना होतील का?
शेतकरी संघटनांकडून मागणी आहे की केंद्र आणि राज्य सरकारने कांद्याच्या दरासाठी संरक्षणात्मक यंत्रणा तयार करावी. सरकारकडून खरेदी वाढवावी आणि किमान आधार दर (MSP) जाहीर करावा अशी मागणी पुन्हा जोर धरत आहे. मागील वर्षी कांदा निरातीवर निर्बंध घालण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा नुकसान सहन करावा लागत आहे.
हे पण वाचा | उन्हाळी कांद्याला बाजारात किती मिळतोय दर? जाणून घ्या कांदा बाजार भाव