28 July 2025 Rashi Bhavishya | आज सोमवार… तोही श्रावण महिन्याचा पहिला सोमवार. पंचांगात आजचा दिवस खूप खास आहे. कारण आजपासून सुरू होतोय श्रावण महिन्याचा महापर्वकाळ. भोलेनाथाला अर्पण केलेलं प्रत्येक फूल, प्रत्येक जलार्पण, प्रत्येक प्रार्थना आज थेट त्यांच्या चरणांपर्यंत पोहोचणार आहे. अशा दिवशी ग्रह नक्षत्रांचाही अनोखा संयोग घडतोय. त्यामुळे आजचा दिवस १२ राशींनाही एक वेगळी ऊर्जा, वेगळं बळ देणारा ठरणार आहे.
हे पण वाचा| ‘या’ 5 राशींसाठी आजचा दिवस ठरणार सुवर्णसंधीचा, तुमची राशी यात आहे का?
चला, बघुया आज १२ राशींसाठी काय घेऊन आलंय हे श्रावणी सोमवारचं पुण्यप्रद संयोग.
मेष रास (Aries):
मेष लोकांनो, आज तुमचे विचार मोलाचे असतील, पण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. चर्चा, समजूत घालणं आणि मुद्दा पटवून देणं – या गोष्टींमध्ये वेळ जाईल. पण एकदा का लोकांना तुमचा दृष्टिकोन पटला, की मग तुम्हालाच पुढे पुढे नेतील. वाद न करता संयमानं राहा, दिवस तुमचाच आहे.
वृषभ रास (Taurus):
आज तुम्ही ‘माझंच खरं’ या भूमिकेत अडकाल. पण हे थोडंसं कठीण होऊ शकतं. मानसिक चंचलता जाणवेल, एखादा निर्णय घेताना मन डळमळेल. थोडं थांबा, श्वास घ्या, आणि मग पाऊल टाका. हाच संयम तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल.
मिथुन रास (Gemini):
नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस थोडा विस्कळीत वाटेल. वरिष्ठांशी मतभेद, कामात अडथळे आणि थोडासा मनस्ताप होऊ शकतो. ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी शरीराची काळजी घ्या. तणाव कमी ठेवण्यासाठी योग, ध्यान यांचा आधार घ्या.
हे पण वाचा| ‘या’ 5 राशींसाठी आजचा दिवस ठरणार सुवर्णसंधीचा, तुमची राशी यात आहे का?
कर्क रास (Cancer):
औषधं वेळेवर घ्या – ही आजची महत्त्वाची सूचना. जोडीदाराची थोडी आक्रमक वृत्ती आज त्रासदायक वाटेल. पण त्याला प्रतिउत्तर न देता समजूतदारपणानं हाताळा. नाहीतर छोटा वादही मोठा होऊ शकतो. थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा.
सिंह रास (Leo):
आज निर्णय घेण्याचं बळ कमी वाटेल. तुम्हाला काय करायचंय, हे लक्षात असूनही त्यावर ठाम राहणं जड जाईल. महिला वर्ग विशेषतः गोंधळलेल्या मन:स्थितीत दिसेल. एखाद्याशी संवाद साधून निर्णय पक्का करा.
कन्या रास (Virgo):
आज तुमचं कर्तृत्व चमकणार आहे. कामात इतकं गुंतून जाल की लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. अंतर्मुख होऊन, शांततेत काम करण्याची संधी मिळेल. यामुळे तुमच्याबाबतचा आदर आणि आकर्षण वाढेल.
तूळ रास (Libra):
शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सोन्याची संधी. अभ्यास, संशोधन, शिक्षक क्षेत्रात असाल तर आज नवीन संधी हाताशी येतील. या संधीचा उपयोग करून घ्या. आजचा दिवस मेंदूला कामाला लावण्यासाठी उत्तम.
हे पण वाचा| ‘या’ 5 राशींसाठी आजचा दिवस ठरणार सुवर्णसंधीचा, तुमची राशी यात आहे का?
वृश्चिक रास (Scorpio):
जुनी देणी वसूल होत नसल्यामुळे मनात चिडचिड निर्माण होईल. कामात संघर्ष, अडथळे येतील. पण खचू नका. जो काही त्रास आहे तो फक्त आजपुरता आहे. संयम ठेवा आणि कामात सातत्य ठेवा. याच प्रयत्नातून मार्ग निघेल.
धनु रास (Sagittarius):
तुमचं मन जे सांगतंय ते करू वाटेल, पण आज वेळ काही वेगळं सांगतोय. तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध वागावं लागेल. सहकाऱ्यांकडून पुरेसं सहकार्य मिळणार नाही. पण याच काळात तुमचं आत्मबल कसोटीला लागेल. डगमगू नका.
Disclaimer :
या लेखामध्ये दिलेली राशीभविष्याची माहिती ही वैदिक ज्योतिषशास्त्र, पंचांग व पारंपरिक तज्ज्ञांच्या अभ्यासावर आधारित आहे. ही माहिती केवळ जनसामान्यांच्या श्रद्धा व ज्योतिषावरील आस्थेच्या दृष्टीकोनातून दिली गेली आहे. याचा हेतू कुणाच्याही भावना दुखावण्याचा नाही. वाचकांनी कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
मकर रास (Capricorn):
वैवाहिक आयुष्यात आज जास्त तडजोड करावी लागेल. घरातील निर्णयांमध्ये तुमचं म्हणणं फारसं चालणार नाही. विशेषतः स्थावर इस्टेटीचे निर्णय थांबवाच. सल्ला घेऊन पुढे जा. नाहीतर मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा| ‘या’ 5 राशींसाठी आजचा दिवस ठरणार सुवर्णसंधीचा, तुमची राशी यात आहे का?
कुंभ रास (Aquarius):
प्रेम प्रकरणांमध्ये आज ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. कोणताही वाद टोकाला नेऊ नका. महिलांसाठी आजचा दिवस थकवणारा आहे. काम, जबाबदाऱ्या यांचा भार जाणवेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.
मीन रास (Pisces):
कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना आज डोकं थंड ठेवा. स्वतःच्या अंदाजावर विश्वास ठेवण्याऐवजी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. तेच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज केलेली योग्य गुंतवणूक भविष्यात मोठं फळ देईल.