जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; नवीन हवामान अंदाज

राज्यात ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाल्यापासून तापमान वाढले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. यामुळे येथे पाऊस पडू शकतो

डिसेंबर अखेरीस राज्यावर अवकाळी संकट घोंगावत आहे. या आठवड्यात गारपीट आणि पाऊस पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे तसेच पुन्हा थंडी अशी हवामानाची विचित्र स्थिती जाणवणार आहे.

सध्या मुंबईत कमाल तापमानात घट झाली आहे यामुळे दिवसभर वातावरणात गारवा जाणवणार आहे. येत्या डिसेंबरच्या शेवटपर्यंत थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईमध्ये 27 ते 29 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण असणार आहे तरीही थंडीची तीव्रता मात्र वाढणार आहे या थंडीमुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकर माणसांना त्रास सहन करावा लागणार आहे.

तसेच कोकणात देखील अवकाळी संकट घोंगावत आहे गेल्या काही दिवसांत गारटा वाढला आहे परंतु आता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या सगळ्या वातावरण बदलामुळे शेतकरी मात्र चिंतेत आहे.

त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन पुढचे नियोजन करायचे आहे.