महाराष्ट्रावर नवीन संकट! IMD कडून या 9 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Weather Updates: महाराष्ट्र राज्यावर मोठे नवीन संकट निर्माण झाले आहे. देशात पुन्हा एकदा हवामान विभागाकडून अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. IMD कडून वर्तवलेल्या अंदाजानुसार 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात वादळी वाऱ्यासोबत अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना अलर्ट जारी देखील करण्यात आले आहे.

देशात पुन्हा एकदा हवामान विभागाकडून अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस पश्चिम बंगाल ओडीसा छत्तीसगड व मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 48 तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता या भागात वर्तवण्यात आली आहे.

हे पण वाचा | सिबिल स्कोर चांगला ठेवण्यासाठी नेमकं काय करावे? तुमचा सिबिल स्कोर किती आहे? वाचा सविस्तर..

राजस्थानमध्ये देखील पावसाचा इशारा हवामान विभागाने केला आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या इशारानुसार राजस्थान मधील अनेक जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये या काळात जोरदार वारे वाहणारा असून तापमान 34 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर झारखंडमध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भातील काही भागात आती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे. IMD Weather Updates

हे पण वाचा | राज्यातील या पाच जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासोबत पावसाचे अलर्ट; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

महाराष्ट्र राज्यातील अमरावती वाशिम नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सध्या नागपूर सह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दोन दिवसात या भागात अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “महाराष्ट्रावर नवीन संकट! IMD कडून या 9 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा…”

Leave a Comment