राज्यातील शाळा कधी सुरू होणार: 16 जून की 23 जून? पालकांमध्ये संभ्रम कायम!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

school starting date: महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना सध्या एकच प्रश्न पडला आहे: नवीन शैक्षणिक वर्षासाठी शाळा कधी सुरू होणार? दरवर्षी 15 जूनला नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते, पण यंदा 11 जून उजाडला तरी शालेय शिक्षण विभागाकडून कोणताही स्पष्ट आदेश न आल्याने सर्वत्र संभ्रम निर्माण झाला आहे.

हे पण वाचा| शेतकऱ्यांनो, पावसाची वाट पाहताय? हवामान खात्याचा ‘हा’ धक्कादायक अंदाज नक्की वाचा

नेमका गोंधळ कशामुळे?

सुरुवातीला, 15 जून 2025 पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार असून 16 जूनपासून राज्यातील सुमारे 25 जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू होतील, असे बोलले जात होते. तर विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील शाळा 23 जूनपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, एप्रिल महिन्याच्या शेवटी शिक्षण संचालनालयाने 23 जून 2025 पासून शाळा सुरू करण्याचा आदेश दिला होता. या आदेशांची जिल्हास्तरावर अंमलबजावणी करणारे कोणतेही स्पष्ट निर्देश अद्याप निघालेले नाहीत. यामुळेच शाळा 16 जूनला सुरू होणार की 23 जूनला, याबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

हे पण वाचा| महाराष्ट्रात मान्सूनचे दमदार पुनरागमन: पंजाबराव डखांचा या जिल्ह्यांना ‘अलर्ट’; जिल्ह्यांची यादी इथे पहा

शाळांचे स्वतःचे निर्णय आणि प्रवेशोत्सवावर परिणाम

या अनिश्चिततेमुळे अनेक शाळांनी आपापल्या स्तरावर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. काही शाळांनी शिक्षकांना 15 जूनपासून बोलावले आहे, तर काहींनी 20 जूननंतरची तारीख निश्चित केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, विद्यार्थ्यांनाही शाळेत उपस्थित राहण्यासाठी वेगवेगळ्या तारखा दिल्या जात आहेत. याचा परिणाम म्हणून दरवर्षी एकत्रितपणे साजरा होणारा प्रवेशोत्सव यंदा विविध दिवशी साजरा होणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. school starting date

हे पण वाचा| खरिपाच्या तोंडावर तुरीची आवक वाढली; तुमच्या जिल्ह्यातील बाजारभाव काय?

गोंधळामागे ‘शालार्थ’ घोटाळा?

शाळा सुरू होण्याच्या तारखांबाबत स्पष्टता नसण्यामागे जिल्ह्यातील ‘शालार्थ’ घोटाळा हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे बोलले जात आहे. या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी पुण्यात तळ ठोकून बसले आहेत, ज्यामुळे जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक निर्णय रखडले आहेत. जून महिन्याचे 10 दिवस उलटूनही शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्याबाबत कोणतीही स्पष्टता दिलेली नसल्यामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. आता येत्या एक-दोन दिवसांत या संदर्भात स्पष्ट आदेश जारी होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “राज्यातील शाळा कधी सुरू होणार: 16 जून की 23 जून? पालकांमध्ये संभ्रम कायम!”

Leave a Comment

error: Content is protected !!