ST Bus Live Location App | गावाकडं जायचं म्हटलं की पहिली आठवण होते ती आपल्या लालपरीची म्हणजेच आपली राज्य परिवहन महामंडळाची एसटी. कुठं रेल्वे जात नाही तिथं ही एसटी पोहोचते. शाळकरी मुलांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत आणि नोकरी करणाऱ्या प्रवाशांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत लाखो लोकांचा रोजचा प्रवास या लालपरीवरच अवलंबून असतो. मात्र याच एसटीची एक मोठी अडचण आजवर अनेकांनी भोगलीय बस नेमकी कुठे आहे? किती वेळ लागेल? थांब्यावर येईल की नाही? आणि मग तासनतास ताटकळणं, उन्हात उभं राहणं, किंवा अंधारात वाट बघत बसणं… पण आता हे सगळं भूतकाळात जाणार आहे.ST Bus Live Location App
हे पण वाचा| ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! सोन्याचा दर घसरला, चांदीतही बदल; पाहा आजचे ताजे भाव..
राज्य परिवहन महामंडळाने एक अत्यंत उपयुक्त आणि प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा निर्णय घेतलाय. “ST Bus Live Location App” या नावाचं एक खास अॅप तयार करण्यात आलं असून, आता प्रत्येक एसटीची थेट लाईव्ह लोकेशन प्रवाशांना अॅपवर दिसणार आहे. म्हणजे अगदी आपल्या मोबाइलवरून आपण पाहू शकणार ‘आपली एसटी कुठपर्यंत पोहोचली आहे’, ‘ती थांब्यावर कधी पोहोचणार आहे’ आणि ‘किती वेळात सुटणार आहे’. हा अॅप 15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे आणि यामुळे लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आज महाराष्ट्रात सुमारे 14,500 एसटी बस धावत असून, यामध्ये GPS सिस्टम बसवण्याचं काम वेगानं सुरू आहे. आतापर्यंत 12,000 बसमध्ये ही यंत्रणा कार्यरत करण्यात आली असून उर्वरित बसमध्येही लवकरच बसवली जाणार आहे. दररोज सुमारे 1.25 लाख फेऱ्या होत असलेल्या एसटी मार्गावर ही सुविधा आल्यावर ग्रामीण भागातील लाखो लोकांचा प्रवास अधिक सोपा, सुरक्षित आणि वेळबद्ध होणार आहे.
हे पण वाचा| महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत तब्बल ₹1140 ची उडी जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव!
साधा एक उदाहरण घ्या समजा, एखाद्या गावात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला पुण्यात शिकायला जायचंय. त्यानं तिकीट आगाऊ आरक्षित केलंय, पण नेमकी एसटी कधी येईल याची माहिती नाही. आजवर अशा वेळेस तो तासन्तास बस स्टॅण्डवर थांबून राहायचा. पण आता तो अगदी मोबाईलवर एसटी कुठे आहे हे पाहूनच निघू शकतो. म्हणजे वेळ वाचणार, मानसिक त्रास टळणार आणि प्रवासातला ताणही कमी होणार.
याचाच पुढचा टप्पा म्हणजे तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खास खुशखबर!
1 जुलैपासून 150 किमी पेक्षा जास्त अंतराचा प्रवास करणाऱ्या (सवलतीशिवाय) प्रवाशांना 15% सवलत दिली जाणार आहे. म्हणजे तुमचं आगाऊ आरक्षण केलं असेल, तर तीटकीट स्वस्त मिळणार! ही सवलत साध्या लालपरीपासून ई-शिवाई, शिवनेरी, सेमी लक्झरी अशा सर्व प्रकारच्या बससाठी लागू आहे. मात्र दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये ही सवलत लागू होणार नाही.
प्रत्येक प्रवाशाच्या उपयोगाची गोष्ट म्हणजे आता आगाऊ आरक्षण करणाऱ्याला एकाचवेळी दोन फायदे होणार आहेत
एक म्हणजे GPS द्वारे लाईव्ह लोकेशनची माहिती, आणि दुसरं म्हणजे तिकिटामध्ये थेट सवलत! ही योजना आषाढी एकादशी, गणपती उत्सव अशा गर्दीच्या काळात देखील लागू राहणार असून फक्त जादा बससाठी ती लागू नसेल.
हे पण वाचा| शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ३० हजारांचं नोंदणी शुल्क माफ जमिनीच्या वाटपाला आता अडथळा नाही!
महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या सवलतीची व अॅपची अधिकृत घोषणा केली असून ती प्रत्यक्षात आणण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. ही योजना फक्त शहरीच नाही, तर खऱ्या अर्थानं ग्रामीण भागासाठी वरदान ठरणार आहे.
आपण तंत्रज्ञानाच्या युगात जगतोय, पण खऱ्या अर्थानं ते तंत्रज्ञान सामान्य माणसाच्या जीवनात कधी उपयोगी ठरतं, तर असाच एखादा निर्णय घेतला जातो तेव्हा! एसटीचं लोकेशन कळणं ही फक्त सुविधा नाही, तर लाखो प्रवाशांच्या रोजच्या आयुष्यातील एक मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे. आता एसटीची वाट बघत उभं राहणं इतिहासजमा होणार आहे… आणि खरं सांगायचं, तर ही नवी लालपरी आता वेळेचीही साथीदार ठरणार आहे!
📌 Disclaimer:
वरील माहिती ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत घोषणांवर आणि प्रसारमाध्यमांतून मिळालेल्या माहितींवर आधारित आहे. वेळोवेळी योजना, तिकीट दर व नियमांमध्ये बदल होऊ शकतात.