सडा वाघापूरच्या पठारावर स्टंट करताना अपघात, कार थेट 100 फुट खोल दरीत  तिघे गंभीर जखमी


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral reel stunt accident | पावसाळा सुरू झाला की सातार्‍याच्या सडा वाघापूर धबधब्याला पर्यटकांची झुंबड उडते. उलट्या धबधब्याचा चमत्कार पाहण्यासाठी आणि फोटो-रील्ससाठी लोकं इकडे वळतात. भव्य पठार, पवनचक्क्यांची रांग, हिरवंगार निसर्ग  अशा या नंदनवनात अनेकजण विसावायला येतात. मात्र, आता हेच निसर्गरम्य ठिकाण एका धोकादायक थराराचा साक्षीदार ठरलं आहे. Viral reel stunt accident

👇👇👇

वायरल एक्सीडेंट व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या सोशल मीडियावर ‘रील्स’ करण्याची प्रचंड क्रेझ आहे. काहीजण फोटो घेतात, तर काहीजण थेट जीव धोक्यात घालून स्टंट करतात. सडा वाघापूरच्या पठारावर असाच एक धोकादायक प्रकार घडला. चार मित्रांचा ग्रुप एका कारमध्ये स्टंट करत होता. त्यात तिघेजण कारमध्ये तर चौथा मोबाईलवरून शूट करत होता. सगळं ठरल्याप्रमाणे सुरू होतं, पण अचानक चालकाचा ताबा सुटला आणि कार थेट दरीकडे झेपावली.

ही दरी साधीसुधी नव्हती  तब्बल १०० फुटांहून जास्त खोल. कार घसरतच गेली आणि शेवटी झाडांच्या बुंध्यांमध्ये अडकली. त्या झाडांनी थोडंसं सावरलं नाही, तर काय हसं झालं असतं हे सांगता येत नाही. पण तरीही कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले. उपस्थित पर्यटकांनी धाडस दाखवत कारजवळ धाव घेतली. कारचे दरवाजे उघडत नव्हते, त्यामुळे दरवाजे फोडून त्या तरुणांना बाहेर काढण्यात आलं.

👇👇👇

वायरल एक्सीडेंट व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अगदी रक्तबंबाळ अवस्थेत तिघांना बाहेर काढण्यात आलं आणि लगेच एका खाजगी वाहनाने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित दोघांनाही गंभीर दुखापती झाल्या असून काही अवयव निकामी होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

हा थरारक प्रकार पाहून अनेक पर्यटक हादरले. काहींनी मदतीसाठी धाव घेतली, काहीजण किंचाळले, तर काहीजण स्तब्ध उभे राहिले. या संपूर्ण घटनेचा सर्वात मोठा धक्का म्हणजे  इतक्या गर्दीच्या पर्यटनस्थळी कोणताही पोलीस बंदोबस्त नव्हता. हे निश्चितच प्रशासनाचं अपयश आहे.

मुळात काही दिवसांपूर्वीच सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रसिद्धीपत्रक काढून नागरिकांना सूचना दिल्या होत्या. “निसर्गाचा आनंद घ्या, पण जीवावर बेतणारे कृत्य करू नका”, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. पण तरीही अशा घटना घडतायत म्हणजे या सूचना हवेत विरून जात आहेत.

👇👇👇

वायरल एक्सीडेंट व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सडा वाघापूरसारख्या ठिकाणी पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने उपलब्ध असणं आवश्यक आहे. प्रत्येकजण मोबाईल हातात घेतो, काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो  पण त्या एका रीलसाठी कोणाचा जीव जाईल हे कुणालाच सांगता येत नाही. सुदैवाने या घटनेत कोणीही मरण पावलं नाही, पण भविष्यात असं घडू नये म्हणून सर्वांनीच सतर्क राहायला हवं.

आपण कितीही ‘कूल’ वाटत असलो, तरी स्टंट करताना वाहनावरचा ताबा सुटणं, दरीत कोसळणं, शरीर निकामी होणं  या गोष्टी शेवटी आयुष्यभराच्या वेदना ठरतात. कृपया स्टंट करताना विचार करा  एक व्हिडीओ लाखोंना आवडेल, पण तो तुमचं आयुष्यच संपवू शकतो.

Disclaimer:

वरील बातमी सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितींवर आधारित असून, यामध्ये दिलेली माहिती केवळ बातमी स्वरूपात सादर करण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा ठिकाणाबाबत हेतुपुरस्सर बदनामी करण्याचा आमचा उद्देश नाही. अपघाताशी संबंधित घटना ही केवळ जनजागृतीसाठी मांडण्यात आली आहे. कृपया अशा धोकादायक कृत्यांपासून दूर राहा आणि सुरक्षित पर्यटनाचा अनुभव घ्या.

हे पण वाचा | कोणती बँक देत नाही कर्ज! करा फक्त एक काम आणि पाच मिनिटात मिळणार तुम्हाला कर्ज 

Leave a Comment