gold and silver price today | सोन खरेदीच्या तयारीत आहात का? मग आजची बातमी तुमच्या खिशावर परिणाम करणारी ठरू शकते. कारण मागील काही दिवसांपासून सातत्याने उच्चांकी गाठणाऱ्या सोन्याच्या दरात आज शुक्रवार, २५ जुलै रोजी मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सोनं अक्षरशः कोसळल्यासारखं पडलं आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल ४९० रूपयांची घसरण झाली आहे.
हे पण वाचा | शेतकऱ्यांनो, पावसाची वाट पाहताय? हवामान खात्याचा ‘हा’ धक्कादायक अंदाज नक्की वाचा
आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत १,००,४८० रुपये इतकी झाली आहे. म्हणजेच कालच्या तुलनेत सोनं आता थोडं स्वस्त झालं आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्यासाठी ९२,१०० रुपये मोजावे लागतील. तर १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ७५,३६० रूपये आहे.
तसं पाहायला गेलं तर एकेकाळी लाखाच्या पार गेलेल्या सोन्याने आज खाली उतरण्याचा निर्णय घेतल्यासारखं वाटतंय. १० तोळं सोन्याच्या हिशोबात बघितलं तर ही घसरण अजून मोठी जाणवते. २४ कॅरेट १० तोळ्यासाठी आता १०,०४,८०० रुपये मोजावे लागणार आहेत, म्हणजेच तब्बल ४,९०० रूपयांची घट. २२ कॅरेट १० तोळं सोनं ९,२१,००० रुपयांना आणि १८ कॅरेट १० तोळं ७,५३,६०० रुपयांना मिळतंय.
हे पण वाचा | Gold Price Today : आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, खरेदीसाठी सुवर्णसंधी
मात्र, चांदी अजूनही आपलं ‘राजसिंगासन’ सोडायला तयार नाही. चांदीचे दर आजही १ लाखाच्या आसपास फिरत आहेत. म्हणजे चांदीच्या दरात फारसा बदल नाही.
सोन्याच्या दरात घसरण का झाली?
जगभरातील परिस्थिती आणि बाजारपेठेचा ताण हे सोन्याच्या दरात होणाऱ्या चढ-उताराचे प्रमुख कारण असते. अलीकडे अमेरिकेने जपान आणि फिलीपिन्ससोबत नवीन व्यापार करार केला आहे. त्यामुळे जागतिक तणाव काहीसा निवळला आहे. गुंतवणूकदारांनी आता सुरक्षित गुंतवणुकीच्या म्हणजेच सोन्याच्या ऐवजी शेअर बाजारासारख्या धोकादायक पण अधिक नफा देणाऱ्या पर्यायांकडे वळायला सुरुवात केली आहे.
याला ‘प्रॉफिट बुकिंग’ म्हणतात जेव्हा गुंतवणूकदारांनी काही काळासाठी फायदा कमावला आणि नफा खात्यात जमा करण्यासाठी विक्री सुरू केली, तेव्हा मागणी थोडी घटते आणि किंमतीत घसरण होते.
भारतामध्ये सोन्याची किंमत ठरते तरी कशी?
भारतामध्ये सोन्याची किंमत अनेक गोष्टींवर अवलंबून असते. सर्वात मोठा प्रभाव आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किंमतीचा असतो. त्यात आयात शुल्क, सरकारने लावलेले कर, डॉलर-रुपयाचा विनिमय दर, देशांतर्गत पुरवठा आणि मागणी हे सगळं एकत्र ठरवतं आजचं सोनं कितीला मिळेल.
भारतीयांसाठी सोनं फक्त गुंतवणूक नसून सण, समारंभ, विवाह, आणि धार्मिक कार्यांमध्ये मानाचं स्थान असलेली गोष्ट आहे. त्यामुळे दरात झालेल्या थोड्याशाही हालचालीचाही थेट परिणाम सामान्य जनतेवर होतो.