दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात झाला मोठा बदल; आजचा दर ऐकून अनेकांच्या हृदयात भरणार धडकी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate Today, October 1 | सणासुदीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि त्याचपूर्वी ग्राहकांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील सणसदीच्या या मुहूर्तावरती तुमच्या घरामध्ये थोडीशी सोन्याची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, यापुढे तुम्हाला सोने खरेदी करणे परवडणार नाही. यासाठी तुमचा पूर्ण खिसा रिकामा होणार आहे. नवीन दर पाहून नक्कीच तुम्हाला धडकी भरणार आहे. तुम्ही म्हणाल आपण तर एक महिना आधीच सोनं खरेदी केलं पाहिजे होतं. नवीन दर काय आहेत हे एकदा जाणून घ्या. Gold Rate Today, October

आज, एक ऑक्टोबरला बाजार उघडताच सोन्याच्या किमतींनी नवीन इतिहास रचला आहे. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन प्रती 10 ग्रॅम तब्बल एक लाख 17 हजार 450 रुपयांवर गेलं, तर 22 कॅरेट सोन 1 लाख 7 हजार 660 रुपयांवर पोहोचले. एवढेच नाही तर चांदीने देखील अक्षरशः आग लावली आहे एक किलो मागं एक लाख 51 हजारवर दर पोहोचलेत.

जर तुम्ही लग्नसराईसाठी तयारी करत असाल आणि त्यापूर्वी सोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर असा भाव पाहून अनेक कुटुंबांनी आता काय करायचं असा प्रश्न उभा राहिला आहे. जर एखाद्या कुटुंबातील व्यक्ती सोनाराकडे जाऊन त्याच्या मुलीच्या लग्नासाठी सोन खरेदी करण्याच्या विचार करत असाल आणि तो सोनाराकडे गेला तर दर ऐकूनच त्याच्या डोक्यावर हात मारून तो परत येईल. अशा घटना आता सर्वत्र पाहायला मिळत आहेत.

जागतिक बाजारात देखील गोंधळ सुरू आहे. अमेरिकेत सरकारी कामकाज ठप्प झाले, डॉलर कमकुवत झालाय आणि अशा सगळ्या घडामोडींमुळे गुंतवणूकदार सोने चांदीकडे वळत आहे. म्हणून बाजारात मागणी वाढून दर आकाशाला भिडलेले आहेत. येत्या दसऱ्याला सोने खरेदी केलं की घरात लक्ष्मी येते असं मानलं जायचं. पण या महागाईमुळे अनेकांना सोनं हात लावण ही परडवत नाही. लोक फक्त चौकशी करतात, पण दागिना बुक करणारे खूपच कमी आहेत असं सोनार म्हणतात.

तर बाजारातील तज्ञ सांगतात की अजून काही दिवस ही तिची कायम राहू शकते. म्हणजे सणासुदीचा आनंद आता सोन्याच्या दरवाढीमुळे गिळून टाकला आहे. यापुढे सोन्याचे दर कसे राहतात हा येणारा काळच ठरवेल.

Leave a Comment

error: Content is protected !!