SIP Investment | आज काल रोज महागाई वाढत आहे, पेट्रोल डिझेल दर काही केल्या कमी होत नाहीत. घर खर्च देखील वाढत चालला आहे घर खर्चाचा तालमेल बसवणे अवघड झाले आहे, पण या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र खरी आहे की शिस्तबद्ध गुंतवणूक केली तर भविष्य सोन्यासारखं उजळू शकते. अगदी शेतकरी असो किंवा नोकरदार किंवा छोटासा दुकानदार, थोडी शिस्त आणि संयम ठेवला तर महिन्याला फक्त दहा हजार बाजूला काढून तुम्ही 1 करोड 2 करोड नव्हे तर 7 कोटी रुपयांचा फंड देखील तयार करू शकता. SIP Investment
कदाचित तुमच्या मनात पहिल्यांदी विचार येईल तो म्हणजे, अरे हे मोठ्याचं काम आमच्यासारख्या सामान्य माणसाकडून काय होणार? पण इथे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही योजना श्रीमंतासाठी नाहीतर हळूहळू श्रीमंत व्हायचं ठरवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. जर तुम्ही हळूहळू या योजनेमध्ये रक्कम गुंतवली तर तुम्ही भविष्यामध्ये करोडपती बनणार आहात.
SIP म्हणजे नेमकं काय ?
Systematic investment plan म्हणजेच SIP म्युच्युअल फंडात प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम आपोआप गुंतवली जाते. म्हणजेच तुम्हाला रोज रोज बाजार बघायची गरज नाही भाव वाढेल किंवा घसरेल तरीदेखील तुम्हाला चिंता करायची गरज नाही. 1 जर बाजार खाली असेल तर जास्त युनिट मिळतात. 2 बाजार वर असेल तर त्याच युनिट ची किंमत वाढते. 3 म्हणजेच रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर कधी जास्त कधी कमी पण सरासरी फायदा होतो.
यामध्ये चक्रवाढीचा जादुही असतो, आधीच्या गुंतवणुकीवर जुनाफा मिळतो त्यावर पुन्हा नफा मिळतो म्हणजेच पैशापासून पैसा तयार होतो.
किती गुंतवणूक केल्यावर किती मिळणार नफा ?
जर तुमचा गुंतवणुकीचा काळ 10 वर्ष असेल तर तुम्ही गुंतवणूक केलेली रक्कम ही 12 लाख रुपये होणार आहे. आणि तुम्हाला अंदाजे परतावा 23.24 लाख रुपये इतका मिळणार आहे.
जर तुमची गुंतवणूक 20 वर्षासाठी असणार आहे तर तुमची एकूण गुंतवणूक केलेली रक्कम ही 24 लाख रुपये होणार आहे. आणि तुम्हाला वीस वर्षानंतर अंदाजे परतावा हा 1 कोटी रुपये च्या जवळपास मिळणार आहे.
जर हीच रक्कम तुम्ही 25 वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुमची गुंतवणूक केलेली रक्कम 30 लाख रुपये आणि तुम्हाला जवळपास परतावा 1.90 कोटी इतकी मिळणार आहे.
30 वर्षे गुंतवणूक केली तर तुमची गुंतवणूक केलेली रक्कम 36 लाख रुपये आणि तुम्हाला मिळणारी रक्कम ही 3.53 कोटी रुपये इतकी राहणार आहे.
35 वर्षे जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुमची गुंतवणूक केलेली रक्कम 42 लाख रुपये आणि तुम्हाला परत मिळणारी रक्कम 6.50 कोटी रुपये असणार आहे.
म्हणजेच आता 42 लाख रुपये गुंतवले तर 6 कोटी पेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे. आणखीन दोन-तीन वर्ष सुरू ठेवली तर 7 कोटी देखील होणार आहे.
या योजनेमध्ये शेतकरी उत्पादनातून जर तुम्हाला महिन्याला दहा हजार रुपये काढणे शक्य असेल तर तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. त्याचबरोबर जे नागरिक नोकरीला आहेत आणि जर तुम्ही इतर कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी ही योजना एक फायदेशीर योजना ठरणार आहे.
आता अनेक नागरिकांना असा प्रश्न पडला असेल की किती वर्षे नंतर तुम्हाला हि रक्कम मिळणार आहे? जर तुम्ही या योजनेमध्ये पैसे गुंतवले आणि दोन वर्षानंतर काढले तर तुम्हाला या पैशावर चक्रवाढीचा फायदा मिळणार नाही. तुम्ही जर वीस पंचवीस वर्ष या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर तुमच्या वृद्ध काळ होईपर्यंत तुम्हाला चांगला नफा मिळणार आह
हे पण वाचा | आजचं राशिभविष्य ! तुमच्या राशीसाठी येणाऱ्या २४ तासांत होणारं आश्चर्यकारक भविष्य काय आहे