Moto G06 Power: तुम्ही जर स्वस्तात दमदार स्मार्टफोन घेऊ इच्छित असाल तर मोटरोला स्मार्टफोन तुमच्यासाठी वरदान ठरवू शकतो. मोबाईल बाजारात आज-काल कमी बचत मध्ये चांगला आणि वेगवेगळ्या फीचर्स चा फोन मिळणे अवघड आहे. पण Moto G06 power ने या स्पर्धेत सगळ्यांनाच मागे टाकले आहे. फक्त 7499 रुपयात येणारा हा फोन 7000mAh ची जबरदस्त बॅटरी 50 MP कॅमेरा आणि आकर्षक डिझाईन सह लॉन्च करण्यात आला आहे.
मोटोरोलाने भारतात आपला नवीन बजेट फोन Moto g06 power लॉन्च केला आहे. या मोबाईलचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याची 7000mAh दमदार बॅटरी. मोबाईलला दिवसभर चार्जिंग करण्याची चिंता कायमचीच मिटणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही व्हिडिओ पाहणे, सोशल मीडियावर वेळ घालवणे, गेम खेळणे सगळं काही निश्चितपणे करता येणार आहे. मोबाईलची चार्जिंग संपेल याची काळजी करावी लागणार नाही. त्याचबरोबर या मोबाईलचा रंग देखील खूप सुंदर आहे. पॅन्टन लोरीस ओक, पॅन्टन ट्रॅन्डल आणि पॅन्टन टेपेस्ट्री त्यांचं व्यंगन लेदर बॅग पॅनल हातात घेतल्यानंतर प्रीमियम फील देत आहे. जे मार्केटमध्ये तुम्हाला या किमतीत कुठेच मिळणार नाही.
डिस्प्ले आणि डिझाईन
Moto g06 power मध्ये 6.88 इंच चा HD प्लस डिस्प्ले दिला आहे. तो 120 Hz रिफ्रेश रेट्स येतो. म्हणजेच स्क्रीन कुल करताना किंवा गेम खेळताना जबरदस्त स्मूथ अनुभव मिळेल. डिस्प्लेवर मॉर्निंग गोरिला ग्लास प्रोटेक्शन दिले आहेत. त्यामुळे लहान सहान क्रंचेस मुळे स्क्रीनला काहीच होणार नाही. याशिवाय फोनचा पिक ब्राईटनेस 6000 नेट्स पर्यंत आहे. त्यामुळे उन्हात देखील स्क्रीन स्पष्टपणे दिसेल.
प्रोसेसर आणि परफॉर्मन्स
या फोनमध्ये MediaTek Helio G81 Extreme प्रोसेसर देण्यात आले आहे. जो दररोजच्या वापरासाठी आणि हलक्या गेमिंग साठी उत्तम मानला जातो. त्याचबरोबर 4 gb रॅम आणि 64 gb इंटरनल स्टोरेज देखील देण्यात आले आहे. जर तुम्हाला जास्त स्टोरेज हवा असेल तर मायक्रो SD कार्डच्या मदतीने ते 1 TB पर्यंत वाढवण्यात येऊ शकते. हे या बजेटमध्ये सर्वात मोठा प्लस पॉईंट मानला जात आहे. Moto G06 Power
कॅमेरा सेगमेंट
फोटो काढण्यासाठी देखील Moto g06 power निराश करत नाही. यात 50 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. जो या किमतीत उत्कृष्ट फोटो कॅप्चर करू शकतो. दिवस असो किंवा रात्र फोटोची क्वालिटी चांगलीच असणार. सेल्फी प्रेमी साठी एक मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. तुझा व्हिडिओ कॉलिंग साठी आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी खूप उपयोगी ठरतो.
बॅटरी आणि चार्जर
यात फोनची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची 7000mAh ची बॅटरी आहे. साधारण वापर केला तर ही बॅटरी दोन दिवस चालू शकते. त्यासोबतच 18 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आले आहे. ज्यामुळे मोठी बॅटरी सुद्धा खूप कमी वेळेत चार्ज होईल. मोटोरोला या फोनमध्ये डॉल्बी ऍटमॉस सपोर्ट दिला आहे. ज्यामुळे म्युझिक आणि व्हिडिओचा अनुभव खूपच उत्कृष्ट पद्धतीने घेता येतो. या फोनमध्ये स्टेरिओ स्पीकर देखील आहेत. वरील सर्व पिक्चर्स फक्त तुम्हाला 7599 रुपयात मिळत आहेत. एवढ्या स्वस्तात एवढ्या फीचर्स चा मोबाईल कुठेच मिळत नाही.