फोन पे, पेटीएम, Google pay, वापरणाऱ्यसाठी मोठी बातमी! सरकारचा हा नवीन नियम लागू !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New UPI Rules : देशभरामध्ये डिजिटल व्यवहारांच जग आणखी बदलणार आहे. आत्ताच मिळालेल्या प्रसारमाधमांच्या माहितीनुसार UPI क्षेत्रात एक नवीन नियम लागू होणार आहे. त्यामुळे आता तुम्ही जरी पासवर्ड विसरलात किंवा पैसे पाठवण्यासाठी अडचण येत असेल तर आता टेन्शन नाही. फक्त तुमचा चेहरा किंवा अंगठ्याच्या माध्यमातून तुम्ही पैसे पाठवू शकणार आहात. केंद्र सरकार आणि नॅशनल पेमेंट कॉपरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांनी मिळून हा मोठा बदल आणला असून, तो 8 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे.

आधी लोकांना UPI पेमेंट करताना पासवर्ड टाकावा लागायचा. अनेक नागरिक त्याला विसरत असे, चुकीचा टाकला तर व्यवहार फेल व्हायचा. आता मात्र ही झंझट संपली! कारण आता मोबाईल तुमचं ओळखपत्र बनेल. तुम्ही फक्त चेहरा दाखवा किंवा अंगठा ठसा द्या आणि पैसे पाठवा इतक सोपं होणार आहे. त्यामुळे कुठलीही झंझट न करता तुम्ही समोर पैसे पाठवू शकणार आहात.

सरकारच्या आधार प्रणालीशी जोडणार नवीन फीचर

NPCI ने सांगितलं की हे नवीन बायोमेट्रिक फीचर्स आधार कार्डाच्या डेटा शी जोडले जाणार आहे. म्हणजे तुम्ही पेमेंट करताना तुमचा चेहरा किंवा अंगठा ओळखून व्यवहार मंजूर होईल. हे फीचर वापरकर्त्यांच्या मोबाईल मध्येच एन्क्रिप्टेड स्वरूपात सुरक्षित राहील. बँक किंवा सरकारलाही तुमचा डेटा पाहता येणार नाही, त्यामुळे गोपनीयतेची चिंता नाही.

सामान्य नागरिकांना मोठा दिलासा

सरकारच्या या निर्णयामुळे आता डिजिटल पेमेंट मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहेत कारण सामान्य नागरिक तसेच वयस्कर लोकांना पासवर्ड लक्षात ठेवणं कठीण जात. अनेकदा PIN विसरल्यामुळे ते डिजिटल व्यवहार करतच नाहीत. पण आता हेच लोक सहज पेमेंट करू करू शकतील. फक्त चेहरा दाखवायचा किंवा अंगठा ठसा द्यायचा काम संपलं. या बदलामुळे डिजिटल व्यवहार वाढणारा अशी शक्यता वर्तवली आहे.

फसवणूक आणि हॅकिंग वर लगाम

सरकारच्या या निर्णयामुळे आता अनेक गोष्टींमध्ये फायदा होणार आहे जसे की फसवणूक किंवा ऑनलाईन हॅकिंग करणे. अनेक वेळा फेक कॉल, फिशिंग लिंक, किंवा पासवर्ड चोरून लोकांची फसवणूक होत होती. पण आता पासवर्डच नसल्यामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. बायोमेट्रिक सिस्टीम मुळे दुसरा कोणी तुमचं नावाने पेमेंट करू शकणार नाही. म्हणजे व्यवहार अधिक सुरक्षित होणार.

RBI ने ही या नव्या प्रणालीला मान्यता दिली आहे. मुंबईत झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टिवल मध्ये या फीचर्स सादरीकरण होणार आहे. देश डिजिटल दिशेने झपाट्याने पुढे चाललाय, आणि आता UPI व्यवहारांचा हा नवा अध्याय प्रत्येकाच्या आयुष्यात सोय, गती आणि विश्वास घेऊन येणार आहे.

(Disclaimer | वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)

Leave a Comment

error: Content is protected !!