Maharashtra Talathi Recruitment 2025- 26 | तरुणांसाठी आनंदाची बातमी! 1700 तलाठी पदांची बंपर भरती सुरू?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Talathi Recruitment 2025- 26 | राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तलाठी पदे रिक्त होती आणि या भरतीची वाट पाहत हजारो तरुणांनी अभ्यास आणि अपेक्षा स्वप्न मनात धरून ठेवली होती. परंतु जर तुम्ही सध्या सरकारी नोकरी व तलाठी भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरात राज्यांमध्ये 1700 पदांची तलाठी भरती होणार आहे यामुळे विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल आहे की, राज्यात लवकर 1700 पदांची मोठी भरती प्रक्रिया होणार आहे. या निर्णयामुळे तरुणांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाच वातावरण निर्माण झाल आहे. Maharashtra Talathi Recruitment 2025- 26

मागील गेलं काही दिवसांपासून जिल्हा आणि तालुका पातळीवर अनेक महसूल मंडळांमध्ये तलाठी रिक्त पद असल्याने कामकाजावर परिणाम होत होता. आता या भरतीमुळे केवळ सरकारी यंत्रणेला चालना मिळणार नाही तर हजारो तरुणांना सरकारी नोकरी मिळणार आहे. दरम्यान महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे आणि त्यावर लवकरच निर्णय होणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केल आहे.

महसूल सेवकांना मिळणार मोठा दिलासा

गेल्या काही वर्षांपासून महसूल सेवक मानधनावर काम करत आहेत. त्यांची प्रमुख मागणी होती की त्यांना चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करून वेतनश्रेणी द्यावी. मात्र शासनाने हे तातडीने शक्य नसल्याचे सांगत, पर्याय म्हणून तलाठी भरती त्यांना काही जागा राखीव ठेवण्याचा निर्णय अनुभवानुसार अधिक गुण देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या विषयावर महसूलमंत्र्यांनी  मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये चर्चा केली.

या बैठकीला मुख्य सचिव राजेश मिना, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओम प्रकाश गुप्ता, महसुली विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे आणि महसूल सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महसूल सेवकांचे उपोषण सोडवताना मंत्र्यांनी त्यांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं, आणि आता त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात होताना दिसत आहे.

गेल्या भरतीतील वाद, पण यावेळी सजगता वाढली

2023 मधील तलाठी भरती दरम्यान काही गैरप्रकार समोर आले होते आणि न्यायालयीन वाद निर्माण झाले होते. पेसा क्षेत्रातील नियुक्त्यांवरून ताण वाढला होता. मात्र, यावेळी सामान्य सजग असून, पारदर्शक आणि नीट नेटक्या पद्धतीने भरती प्रक्रिया पार पाडण्यावर भर आहे. डिसेंबर अखेरपर्यंत या भरतीची सविस्तर अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य सरकारकडून आलेली ही घोषणा सनसुदीच्या तोंडावरती विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी नाहीतर हजारो तरुणांसाठी एक आशाच किरण आहे. कोचिंग क्लासेस मध्ये गडबड वाढली आहे आणि आता पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात झालेली आहे तरुणांमध्ये एकच वातावरण आहे की पुन्हा ही संधी गमावायची नाही.

Leave a Comment