Soybean Farmers News | महाराष्ट्रामध्ये, सध्या मोठ्या थाटामध्ये दिवाळीचा सण साजरा केला जात आहे, अशातच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे शासनाच्या माध्यमातून लवकरच हमीभाव दराने सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. शासनाचा महत्त्वाचा निर्णय काय यासाठी ही बातमी सविस्तर वाचा. Soybean Farmers News
खरंतर महाराष्ट्र मध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सोयाबीनची मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात शेती केली जाते. सोयाबीन एक तेलबिया पिक असून याची राज्यातील मराठवाडा, विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी लागवड करतात. त्याचबरोबर मध्यप्रदेश मध्ये देखील सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते. मध्य महाराष्ट्रात देखील या पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड वाढलेली आहे.

या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढत आहे परंतु मागच्या दोन-तीन वर्षांपासून सोयाबीन पिकाला योग्य भाव मिळत नाही व शेतीला केलेला खर्चही निघत नाही यामुळे अनेक शेतकरी सोयाबीन पीक परवडत नसल्याचे बोललं जात आहे. तर काही प्रसार माध्यमांमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, सोयाबीन पिकाची उत्पादन दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहेत आणि सोयाबीन पिकाला योग्य भावही मिळत नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे चित्र निर्माण झालेल आहे.
परंतु याच पार्श्वभूमीवरती एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. ज्या शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरामध्ये सोयाबीन विकावी लागत होती. त्यांना आता शासकीय हमीभाव MSP वर सोयाबीन विक्री करावी लागणार आहे. शासनाच्या माध्यमातून शासकीय हमीभावाची खरेदी सुरू होणार हा सवाल कायम आहे अशातच या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे.
लाखो शेतकऱ्यांच्या माध्यमातून शासकीय हमीभावात सोयाबीन खरेदी कधी सुरू होणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु आता या संदर्भात आपल्या हाती एक मोठी अपडेट आलेली आहे. त्यावर्षी केंद्रात सोयाबीनला 5,328 रुपये MSP अर्थातच हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार लवकरच शासकीय हमीभाव सोयाबीन खरेदी सुरू होणार आहे.
याची माहिती आम्हाला प्रसार माध्यमांमध्ये मिळालेले असून सोयाबीन खरेदी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे पुढील महिन्यात सोयाबीन ची खरेदी सरकार करणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात खरेदी केंद्रात सुरू होणार आहे. तसेच याचे प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली असून लवकरात नोव्हेंबरमध्ये शासकीय हमीभाव खरेदी सुरू होणार अस सांगितले आहे. या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि यापुढे देखील त्यांना शेती करण्यास प्रोत्साह मिळेल.
