Bank Rule Change: देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बँक खातेधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तुमचे देखील देशातील कोणत्याही बँकेत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. केंद्र सरकारने बँकिंग क्षेत्रातील एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेवर होणार आहे. एक नोव्हेंबर 2025 पासून बँकिंग कायद्यातील काही महत्त्वाचे नियम बदलण्यात आले आहेत.
आत्तापर्यंत बँक खातेधारकांना त्यांच्या खात्यावर किंवा लॉकरवर जास्तीत जास्त एक किंवा दोन नॉमिनी लावण्याची परवानगी दिली जात होती. मात्र आता अर्थ मंत्रालयाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार खातेधारकांना एक दोन नव्हे तर तब्बल चार नॉमिनी लावता येणार आहेत. अर्थ मंत्रालयाने बँकिंग कायदा 2025 मध्ये सुधारणा करत हा नवीन नियम लागू केला आहे. हा नियम 1 नोव्हेंबर पासून देशभरात लागू केला जाणार आहे. यानुसार कोणत्याही बँकेत बचत खाते, चालू खाते, एफडी खाते तसेच लॉकर साठी चार वेगवेगळी नॉमिनी लावता येणार आहेत.
यापूर्वी फक्त दोन नॉमिनीची मर्यादा घालवण्यात आली होती. त्यामुळे अनेक वेळा वारसदारांमध्ये वाद निर्माण होत असे. आता चार नॉमिनी सुविधा मिळाल्यामुळे ही समस्या सुटणार आहे. तुम्ही एकाच वेळा चार वेगवेगळ्या नॉमिनींना तुमच्या प्रॉपर्टीचा वारसदार बनवू शकतात. यामुळे आपसात होणारी भांडणं संपुष्टात येतील. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिकांना सकारात्मक फायदा मिळणार आहे.
या निर्णयामुळे काय फायदा होणार?
- या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ग्राहकांचे पैसे आणि संपत्ती अधिक सुरक्षित राहणार आहे.
- नॉमिनी बाबत स्पष्ट नियम असल्याने बँकेला आणि वारसांना कोणताही गोंधळ होणार नाही.
- बँक खातेधारक स्वतः ठरू शकतो की कोणत्या किती टक्के हिस्सा द्यायचा आहे.
- एखादा नॉमिनीचा मृत्यू झाल्यास पुढील नॉमिनीला आपोआप अधिकार मिळतील.
- एकूणच हा नियम बँक व्यवहारात पारदर्शकता आणि सुलभता आणण्यास उपयोगी ठरणार आहे.
नवीन व्यवस्थेनुसार लॉकर आणि सेफ कस्टडीमध्ये ठेवलेल्या वस्तूंनाही हाच नियम लागू केला जाणार आहे. लोकर साठी ही चार नॉमिनी लावता येणार आहेत. एखाद्या नोमिनीचा मृत्यू झाल्यास दुसऱ्याला त्यानंतर तिसऱ्याला किंवा चौथ्याला क्रमाने अधिकार मिळणार आहेत. यामुळे अनेक वेळा होणारे वाद आणि कायदेशीर अडचणी कमी होणार आहेत. प्रत्येक ग्राहक आपल्या मर्जीप्रमाणे कोणालाही किती टक्के हिस्सा द्यायचा हे ठरू शकतो. Bank Rule Change
अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे की, बँकिंग व्यवस्थित पारदर्शकता आणणे ग्राहकांचा विश्वास वाढवणे आणि खातेधारकांना संरक्षण देणे हाच या निर्णया मागचा मुख्य उद्देश आहे. अनेक वेळा खातेदाराच्या मृत्यूनंतर पैसे किंवा लॉकर मधील मालमत्ता कोणाला मिळावी यावर वाद निर्माण होतो. त्यामुळे बँकांना अडचण निर्माण होते. आता चार नोमिनीची सुविधा दिल्याने प्रत्येक व्यवहार कायदेशीर दृष्ट्या अधिक स्पष्ट आणि पारदर्शक होतील.
जर तुमचे देखील खाते कोणत्याही बँकेत असेल आणि तुम्ही अजून नॉमिनी लावलेले नसतील तर लवकरात लवकर बँकेत जाऊन नोंदणी करून घ्या. एक नोव्हेंबर पासून नवा नियम लागू होताच तुम्हाला हवे असल्यास अजून तीन नॉमिनीची भर घालता येईल. बँकेत जाऊन फॉर्म भरून किंवा नेट बँकिंग द्वारे ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्या देखील करू शकतात. सरकारने हा निर्णय केवळ बँकिंग क्षेत्रासाठी घेतला नसून सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील मोठी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आपल्या मेहनतीने कमवलेले पैसे भविष्यात सुरक्षित ठेवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. आता प्रत्येक ग्राहक आपल्या परिवारातील चार जणांना सुरक्षिततेचा आधार देऊ शकतो.

1 thought on “१ नोव्हेंबरपासून बँकेच्या नियमात मोठा बदल होणार! जाणून घ्या सरकारने कोणता निर्णय घेतला?”