Gold Price Today: मागील काही दिवसापासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहे. दिवाळीचा सण नुकताच पार पडल्यामुळे बाजारामध्ये खरेदीची लगबग कमी झाली आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींमुळे सोन्याचे दर पुन्हा घसरण्यास सुरुवात झाली आहे. मागील चार दिवसांमध्ये सोन्याचे दर तब्बल 7 हजार रुपयांनी घसरले आहेत. सोन्याच्या किमतीमध्ये झालेली घसरण पाहून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तुम्ही देखील सोन्याचे दागिने किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
सोनं झालं 7000 रुपयांनी स्वस्त
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला 24 कॅरेट सोन्याचा दर प्रत्येक वेळा तब्बल 1,30,624 रुपये एवढा होता. पण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण होऊन 1,23,255 रुपये प्रति तोळा एवढे झाला आहे. म्हणजेच फक्त चार दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये तब्बल 7369 रुपयाची घसरण झाली आहे. ही घसरण केवळ मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर नसून पूर्ण देशभरातील सराफ बाजारामध्ये दिसून आली आहे. तुम्ही देखील सोन्याचे दागिने खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. Gold Price Today
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात देशभरातील बाजारात सोन्याची किंमत तब्बल 6,115 रुपयांनी घसरली आहे. सोमवारी 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 1,27,633 रुपये इतकी होती. ती किंमत आठवड्याच्या शेवटच्या दिवशी घसरून 1,21,518 एवढी झाली आहे. सोन्याचे किमतीमध्ये झालेली घसरण पाहून बाजारांमध्ये पुन्हा ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. सोन्याचे दर घसरल्यामुळे ग्राहक पुन्हा सोनं खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये दाखल होत आहेत.
हे पण वाचा| घरबसल्या या योजनेतून कमवा 6 हजार रुपये, गुंतवणूक करण्यासाठी जाणून घ्या संपूर्ण माहिती
फक्त 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत नव्हे तर 18 आणि 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत देखील मोठी घसरण नोंदवली गेली आहे. दिवाळी आणि लग्नसराई संपल्याने मागणीमध्ये घट झाली असून त्यामुळे बाजारात दर खाली आले आहेत. तज्ञांच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात सोन्याच्या किमती पुन्हा वाढू शकतात. त्यामुळे तुम्ही देखील सोने खरेदी करू इच्छित असाल तर या सुवर्णसंधी चा फायदा घ्या. सोन्याचे दर संपूर्ण देशभरात जवळपास सारखेच असतात परंतु वेगवेगळ्या शहरानुसार जीएसटी आणि मेकिंग चार्जेस वेगळी असतात त्यामुळे प्रत्येक शहरानुसार सोन्याच्या किमतीत थोडा फरक आढळू शकतो.
सोन्याची किंमत का बदलते?
तुम्हीदेखील सोन्यात गुंतवणूक करू इच्छित असाल तर सोन्याची किंमत कोणत्या कारणांमुळे बदलते हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. सोन्याच्या किमतीवर आंतरराष्ट्रीय घटकाचा थेट परिणाम होतो. डॉलरच्या मूल्यातील वाढ अमेरिका आणि मध्यपूर्वेतील तणाव तसेच क्रूड ऑइलच्या दरात चढ-उतार यामुळे गुंतवणूकदारांची मानसिकता बदलते. गेल्या काही दिवसात डॉलर मजबूत झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यामधील गुंतवणूक कमी केले आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होताना दिसत आहे.
अनेक तज्ञांच्या मते सध्या बाजारात अजून सोन्याचे दर काही प्रमाणात स्थिर राहू शकतात. मात्र जागतिक आर्थिक संकेत सकारात्मक राहिल्यास सोन्याचे दर पुन्हा वाढू शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी खरेदीसाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी थोडी प्रतीक्षा करणे फायद्याचे ठरू शकते. भारतीय संस्कृतीमध्ये सोनं अविभाज्य भाग आहे. सनसमारंभ लग्न प्रत्येक प्रसंगी सोन्याचे खरेदी शुभ मानली जाते. मात्र अशा घसरणीच्या काळामध्ये सोनं खरेदी करणे नेहमीच फायद्याचे ठरते. कारण सोन नेहमीच वाढत असतं पण त्यात गुंतवणूक योग्य वेळी करणे हेच खऱ्या अर्थाने महत्त्वाचे असते.
