Ladki Bahin Yojana News | राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेले आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबाबत. ही योजना सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेतून पात्र असणाऱ्या महिलांना दीड हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. एकाच वर्षात महिलांच्या खात्यावरती अठरा हजारांचा लाभ जमा झालेला आहे. आतापर्यंत या योजनेची एकूण 15 हप्ते मिळाले आहेत. सणासुदीच्या मुहूर्तावरती महिलांना या योजनेचे पैसे मिळत असतात. Ladki Bahin Yojana News
लाडक्या बहिणी योजनेची केवायसी करण्यासाठी इथे क्लिक करा
मागच्या काही दिवसांपूर्वीच महिलांच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला होता. आता लगेच दिवाळीमध्ये भाऊबीज निमित्त ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार अशी आशा महिलांमध्ये निर्माण झाली होती. पण भाऊबीज झाली तरी महिलांच्या खात्यावरती हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे दिवाळी भाऊबीजेचा मुहूर्त हुकला आता नवीन मुहूर्त केव्हा येणार? असा प्रश्न महिलांमधून उपस्थित केला जात आहे तर याच बाबत सरकारकडून एक महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे.
मिळालेल्या अपडेट मध्ये लवकरच महिलांच्या खात्यावरती ऑक्टोबर हप्ता जमा होणार आहे. ऑक्टोबर महिना संपण्याच्या आत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती सूत्रांनी व्यक्त केलेली आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता उशिराने म्हणजे ऑक्टोबर महिन्यात जमा करण्यात आला होता, तसेच काही प्रसारमाध्यमांमध्ये हा हप्ता देखील उशिराने मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणी योजनेतील केवायसी प्रक्रियेला देखील तात्पुरता ब्रेक देण्यात आलेला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपरिषद आणि जिल्हा परिषद च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही केवायसी प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे. जशा निवडणुका संपणार त्यानंतर ही प्रक्रिया सुरू होईल. सध्या सर्व महिलांना सांगू इच्छितो की सरकारने केवायसी प्रक्रिया स्थगित केली असली तरी पुढील अत्याचे वितरण सुरू राहील अशी शक्यता सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात महिलांच्या खात्यात ऑक्टोबरचा हप्ता जमावण्याची शक्यता आहे त्यामुळे महिलांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे आता कधी जमा होतो याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींनो, बँक खातं तपासा! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात..
