Ladki Bahin Yojana : राज्य सरकारांतर्गत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खूप महत्त्वाची योजना ठरत आहे. दिवसेंदिवस या योजनेची क्रेझ वाढत असतानाच ही योजना महिलांसाठी एक मोठा आर्थिक आधार बनत आहे. गेल्या वर्षीचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने ही योजना सुरू केली होती. या योजनेची सुरुवात जुलै 2024 मध्ये करण्यात आली त्या दिवसापासून आत्तापर्यंत महिलांच्या खात्यावरती 14 हप्ता जमा झालेले आहेत आणि आता पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. Ladki Bahin Yojana
अनेक दिवसांपासून, प्रसार माध्यमांमध्ये लाडक्या बहिण योजनेचा हप्ता या तारखेला जमा होणार त्या तारखेला जमवणार अशा अफवा पसरलेल्या जात होत्या. परंतु आता एक मोठी अपडेट समोर आलेले आहे महिलांच्या खात्यात पैसे जमाना झाल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता परंतु आता चिंता नको ही बातमी महिलांसाठी खूप आनंदाची ठरणार आहे.
येत्या काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मोठं पाऊल उचलणार आहे. राजकारणावस्था महिलांच्या खात्यावरती सरकार दोन महिन्याचे पैसे सोबत देणार असल्याची बातमी समोर आलेली आहे.
काही नामांकित वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्ता महिलांच्या खात्यावरती दिले जातील परंतु यासोबत महिलांना एक हप्ता नव्हे तर दोन हप्ते सोबत मिळणार आहेत अशी अपडेट आलेली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर राज्यांमध्ये जाहीर होणार आहेत 15 नोव्हेंबर पूर्वी जाहीर होतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याच दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुद्धा लागणार आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सुमारे दोन कोटी लाभार्थ्यांना नोव्हेंबर चा हप्ता देण्याचा नियोजन सुरू असल्याचं माहिती समोर आलेली आहे. राज्याचे फडवणी सरकार याच आठवड्यात लाडक्या बहिणींना दोन हप्ते देण्याचा निर्णय घेऊ शकते असंही बोलले जात आहे.
नक्कीच आचारसंहितेच्या पूर्व लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळाले तर महिलांना एक मोठी भेट मिळणार आहे. तर खरंच स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती महिलांना तीन हजार रुपये मिळणार का याकडे आता पाहण्यासारखे राहणार आहे.
 
					 
		