Ration Card New Updates: देशभरातील लाखो गोरगरीब कुटुंब रेशन कार्ड अंतर्गत शिधा मिळतो त्यावर अवलंबून आहेत. गरीब कामगार मजूर वर्गांसाठी रेशन कार्ड म्हणजेच त्यांच्या जगण्याचा व जेवणाचा आधार आहे. अशाच लाखो शिधापत्रिका धारकांसाठी केंद्र सरकारकडून एक ऐतिहासिक आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबांच्या घरातील धान्याचे मोजमाप बदलणार आहे. यामुळे कोणाला जास्त धान्य मिळणार आहे तर कोणाला कमी धान्य मिळणार आहे.
आतापर्यंत अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रतिक कुटुंब 35 किलो धान्य दिले जात होते. मात्र आता या नियम बदल करून क्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ एका घरात दोनच लोक असतील तर त्यांना 35 किलो धान्य मिळत होते आणि जर एखाद्या कुटुंबात सात लोक असतील तर त्यांना देखील तेवढेच धान्य मिळत होतं. त्यामुळे काही कुटुंबांना गरजेपेक्षा जास्त तर काहींना फारच कमी धान्य मिळत होतं. यामध्येच क्षमता निर्माण करण्यासाठी सरकारने हा नवीन निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारकडून प्रस्ताव मांडण्यात आला आहे की पुढील काळात अंत्योदय रेशन कार्ड धारकांना प्रतिव्यक्ती या आधारावर धान्य दिले जाईल. म्हणजेच आता प्रत्येक सदस्यांसाठी 7.5 किलो धान्य दिले जाणार आहे. त्यामुळे आता एखाद्या कुटुंबात चार सदस्य असतील तर त्यांना 30 किलो धान्य मिळेल. आणि जर एखाद्या कुटुंबात सहा सदस्य असतील तर त्यांना 45 किलो धान्य मिळेल. यामुळे मोठ्या कुटुंबातील लोकांना त्यांच्या घरातील सदस्यांच्या संख्येप्रमाणे धान्य दिले जाईल. Ration Card New Updates
हे पण वाचा| १ नोव्हेंबर पासून आधार कार्डसंबंधित सगळ्यात मोठा बदल; या नागरिकांना मिळणार मोठा फायदा
कोणाला होणार फायदा आणि कोणाला तोटा?
सरकारच्या या नवीन निर्णयामुळे काहींना मोठा फायदा मिळणार आहे. तर या नवीन निर्णयाचा काही जणांना फटका देखील बसणार आहे.
- मोठ्या कुटुंबांना फायदा: सात आठ सदस्य असलेल्या कुटुंबांना आता जास्त धान्य मिळणार आहे.
- लहान कुटुंबांना तोटा: दोन ते तीन सदस्य असणाऱ्या कुटुंबांना पूर्वीपेक्षा कमी धान्य मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सध्या देशात 1.71 कोटी अंत्योदय कार्ड धारक कुटुंब आहेत. त्यापैकी जास्तीत जास्त कुटुंब पाच किंवा त्यापेक्षा कमी सदस्य असणारे आहेत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे सरकारचा धान्य साठा टिकून राहणार आहे. त्याचबरोबर गरजू लोकांना अन्यथानाची मदत होईल असा दावा देखील करण्यात येत आहे. रेशन कार्ड च्या नवीन बदलामुळे धान्य वितरणामध्ये पारदर्शकता वाढेल आणि प्रत्येकाला त्यांच्या हक्काचे धान्य मिळेल. अनेक वेळा मोठ्या कुटुंबांना पुरेसे ध्याना मिळण्यामुळे वाद निर्माण होत होते. लोकांच्या तक्रारी प्राप्त होत्या या सर्व समस्या आता मोठ्या प्रमाणात कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मार्चपासून लागू होण्याची शक्यता
केंद्रीय अन्न मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार हा नवीन निर्णय 2026 च्या मार्च महिन्यापासून लागू केला जाऊ शकतो. मंत्रालयाचे अधिकारी सांगतात की धान्य वितरणाची ही सुधारित पद्धत म्हणजेच रेशन यंत्रणेतला ऐतिहासिक टप्पा आहे. अशा पद्धतीने धान्य वितरित केले तर प्रत्येक सदस्यांना न्याय मिळेल आणि त्यांच्या हक्काचा धान्य देखील मिळेल. या निर्णयाचा उद्देश योग्य असला तरी गावोगावी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया केल्या जात आहेत. लहान कुटुंब कमी धान्य मिळणार असल्यामुळे नाराज आहेत. मात्र दुसरीकडे मोठ्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. आमचं कुटुंब मोठा आहे अगोदर मिळणाऱ्या धान्यामध्ये भागत नव्हतं आता जास्त धान्य मिळाल्यामुळे पोटभर जेवण मिळेल असं लाभार्थ्यांचे म्हणणं आहे.
 
					 
		