Karj Mafi: राज्यात सध्या सर्वात चर्चेचा असलेला मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी. अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामासाठी शेतीची मशागत व बि–खत खरेदी करण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतजमीन पाण्याखाली आहे आणि बँकेचे कर्ज जशास तसे आहे. अशावेळी सरकारकडून कर्जमाफी हा शब्द जरी उच्चारला तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात असेच किरण दिसते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. चला तर मग जाणून घेऊया मुख्यमंत्री कर्जमाफी बाबत काय म्हटले?
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
यशदा येथे आयोजित प्रगत उत्पादन क्षेत्रातील जागतिक नेतृत्वासाठी भारताच्या उत्पादन क्षेत्राचा पुनर्रचना आराखडा या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना प्रथम मदत करायची का? कर्जमाफीचा निर्णय घेऊन बँकाचा फायदा करायचा. हा सध्या प्रश्न उपस्थित आहे. कर्जमाफी केली तर पैसे थेट बँकांना जातील शेतकऱ्यांच्या हातात मिळणार नाहीत. त्यामुळे तातडीने मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणे सध्या आवश्यक आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना काय हवं आहे हे पाहूनच आमच्या सरकार निर्णय घेत आहे.
त्यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, सरकार कर्जमाफी विरोधात नाही पण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. सध्या राज्य सरकारने अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. त्या रकमेचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांना सध्या आर्थिक दिलासा ची गरज आहे. आमचे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच सकारात्मक आहे. अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे. Loan waiver
बच्चू कडू यांचे कर्जमाफीसाठी आंदोलन
दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आंदोलन करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, कडू यांच्या आंदोलनापूर्वी आम्ही बैठक बोलावली होती चर्चा करून प्रश्न सोडवू असे देखील सांगितले होते. पण त्यांनी बैठकीला येणे टाळलं प्रश्न फक्त आंदोलनाने सुटत नाही त्यासाठी चर्चा आणि कृती आराखडा असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री यांनी यावेळी आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल खंत व्यक्त केली. Karj Mafi
या आंदोलनामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास झाला. अशाप्रकारे नागरिकांना वेठीस धरण योग्य नाही. आंदोलनात अनेक अपप्रवृत्ती शिरतात. आम्ही चर्चा करायला तयार आहोत पण रेल रोको किंवा गोंधळ घालून प्रश्न सुटणार नाहीत. असं देखील त्यांनी ठमकावून सांगितल आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे आता राज्यात एक नवीन समीकरण तयार झाले आहे. खरंच सहसकट कर्जमाफी केली तर पैसे बँकांना मिळतात आणि शेतकऱ्यांच्या हातात काही शिल्लक राहत नाही. दुसरीकडे अतिवृष्टीमुळे शेप पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ रोख रक्कम मिळणे देखील आवश्यक आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आर्थिक मदत मिळेल. कर्जमाफी हा दीर्घकालीन उपाय असला तरी तातडीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी थेट खात्यात पैसे जमा होणे आवश्यक आहे.
कर्जमाफी बाबत सरकारची भूमिका सकारात्मक
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे मदतीचा प्रवाह सुरू आहे. कर्जमाफी बाबत देखील सरकार सकारात्मक आहे. कर्जमाफी करणार नाही असं आमचं मत नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल पण सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीची मदत पोहोचवणे हेच प्राधान्य असायला हवं. असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. काही जरी असलं तरी राजकारण बँका कर्जमाफी आणि आंदोलन या सगळ्यांमध्ये शेतकऱ्याचे मात्र कोंडी होत आहे. पावसाने हिरावून घेतलेले पीक परत उभा करण्यासाठी त्याला आता हवी आहे आर्थिक मदत. त्याचबरोबर शेतकऱ्याची कर्जमाफी होणे देखील तेवढेच आवश्यक आहे. आता सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
 
					 
		