शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करायचंय! फक्त एक अर्ज करा, अन् या योजनेअंतर्गत मिळेल थेट 50% पर्यंत अनुदान..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tractor Subsidy Yojana | शेतकऱ्याचे आयुष्य म्हणजे खूप कष्ट करून निसर्गावर अवलंबून राहणे. माझा मोलाची बियाणे मातीत कालवून चांगलं उत्पन्न मिळेल या अपेक्षाने पीक काढणीपर्यंत सर्व खर्च भागवणे खूपच कठीण आहे. अशा परिस्थितीत जर ट्रॅक्टर सारखे महागडे यंत्र खरेदी करून आधुनिक शेती करायचं स्वप्न पाहून पूर्ण करणं अवघड आहे. मात्र आता हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. कारण राज्य शासनाने सुरू केलेल्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर थेट 50% पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी ट्रॅक्टर सारखे महागडे यंत्र अक्षरशः अर्ध्या किमतीत मिळणार आहे.Tractor Subsidy Yojana

शेतकऱ्यांसाठी मोठी सबसिडी देणारी योजना

कृषी विभागामार्फत दरवर्षी शेतकऱ्याच्या मदतीसाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या सर्व योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून आधुनिक शेती उपकरणाचा वापर करून जास्तीचे उत्पादन कसे मिळवता येईल. अशाच एक योजनेपैकी सर्वाधिक लोकप्रिय योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजना. या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर पावर टिलर, स्प्रे पंप, कल्टीव्हेटर, रोटाव्हेटर यासारखी अनेक अवजारे सबसिडीतून दिली जातात. यामध्ये शासनाकडून 50% पर्यंत अनुदान दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या स्वप्नातील महागडी अवजारे खरेदी करण्यासाठी मोठा आर्थिक हातभार लागतो.

योग्य वेळी अर्ज करणे महत्त्वाचे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत प्रथम अर्ज करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. म्हणजेच जो शेतकरी आधी अर्ज करेल त्या शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर वेळ वाया न लावता लगेच महाडीबीटी पोर्टल वर जाऊन ट्रॅक्टर साठी किंवा इतर आवश्यक अवजारासाठी आपला अर्ज दाखल करा.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

७/१२ आणि ८ अ उतारा
आधार कार्ड
बँक पासबुक
कोटेशन
फोटो व सही
मोबाईल नंबर
फार्मर आयडी

महाडीबीटीवर अर्ज केल्यानंतर तुमची निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना वरील सर्व कागदपत्रे दिलेल्या मुदतीत अपलोड करणे आवश्यक आहे. कागदपत्रे वेळेत सादर न केल्यास लाभ रद्द होऊ शकतो.

आजच्या काळात शेतीत यशस्वी व्हायचं असेल तर आधुनिक यांत्रिकीकरण वापरणे आवश्यक आहे. ट्रॅक्टर असणं म्हणजे शेतीकाम सोपं होणं त्याचबरोबर वेळ आणि खर्च देखील वाचतो. म्हणूनच जर तुम्ही अजूनही विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. सरकारच्या या भन्नाट योजनेचा वापर करून तुमच्या स्वप्नातील ट्रॅक्टर खरेदी करा.

Leave a Comment