Cyclone alert | राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी पुन्हा एकदा समोर आलेली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पाऊस जाता जाईना शेतकऱ्यांना शेतातील कामे सुधारणात पुन्हा मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे राज्यातील कापूस सोयाबीन या पिकाला मोठा फटका बसलेला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रावरती चक्रीवादळाचा मोठा इशारा आहे. Cyclone alert
बंगालच्या उपसागरावर पुन्हा चक्रकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, चार नोव्हेंबर पासून ही चक्रीवादळ तीव्र होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर राज्यात वाढेल असा हवामान खात्याने सांगितलेल आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तर अंदमान समुद्रावर 55 किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील आणि समुद्र ही खवळलेला राहील. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा आणि किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिलेला आहे.
हवामान खात्याचा या जिल्ह्यांना इशारा
हवामान खात्याने त्यांच्या नवीन हवामान अंदाज मध्ये राज्यातील काही महत्त्वाच्या जिल्ह्यांना इशारा दिलेला आहे. यामध्ये कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे. बीड, नांदेड, हिंगोली, लातूर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्याने गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
आधीच्या चक्रीवादळाने लोकांना मोठा फटका दिलेला आहे आणि पुन्हा एकदा हे नवीन चक्रीवादळ शेतकऱ्यांना मोठा चटका देणारे ठरणार आहे. आधीच सप्टेंबर महिन्यात शेतीपूर्ण वाहून गेली. शेतकरी कुठेतरी सावरतोय तर पुन्हा एकदा हा निसर्ग शेतकऱ्यांना पूर्णपणे घायाळ करत आहे. आता शेतकऱ्याच्या मनामध्ये पुन्हा एकदा भीती बसलेली आहे माझ त्यांच्या चेहऱ्यावरती चिंता पसरलेली आहे.
हवामान खात्याने पष्ट केला आहे की, पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील आणि पावसाचा जोर अधून मधून वाढत राहील. समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांना आणि शेती पट्ट्यातील लोकांना सतर्क राहण्याचा आव्हान देखील करण्यात आलेल आहे.
हे पण वाचा | एक मोठ चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार! या भागातील शेतकऱ्यांना मोठा इशारा
1 thought on “राज्यावरती पुन्हा एकदा चक्रीवादळाचा फटका; या 11 जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस वाचा सविस्तर”