Pan Card New Update: तुमच्या आर्थिक आयुष्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे पॅन कार्ड. कर भरणा असो बँकेत खाते उघडणे असो किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचे असो या सर्व गोष्टींसाठी पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण केली तुमचे पॅन कार्ड बंद होऊ शकते. एक जानेवारी 2026 पासून तुमचं पॅन कार्ड बंद झाले तर काय होईल? एक छोट्याशा चुकामुळे तुमचं बँकिंग इन्व्हरमेंट आणि सरकारी व्यवहार सगळं ठप्प होऊ शकत. सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही जर पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नाही तर 1 जानेवारी 2020 पासून तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल.
आधार पॅन लिंकिंग करण्यासाठी सरकारचा उद्देश स्पष्ट आहे. आर्थिक पारदर्शकता आणि कर चुकगिरीवर आळा घालणं. पण सर्वसामान्य नागरिकांसाठी ही लिंकिंग प्रक्रिया त्यांच्या आर्थिक सुरक्षतेसाठी अति आवश्यक आहे. Pan Card New Update
पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यावर काय होईल?
- तुम्ही income tax return भरू शकणार नाहीत.
- बँक खाते उघडताना त्रास होईल.
- FD, mutual fund, शेअर मार्केट मधील व्यवहार ठप्प होतील.
- मोठे व्यवहार करताना पॅन कार्ड आवश्यक असते.
विशेष म्हणजे अजूनही लाखो लोकांनी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक प्रक्रिया केलेली नाही. काही लोकांना माहिती नाही तर काहीजण करू नंतर म्हणून टाळत आहेत. काही जणांना वाटत आहे की हा सरकारचा फक्त तात्पुरता नियम आहे. पण यावेळी सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, डेडलाईन पूर्वी म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर एक जानेवारी 2026 पासून तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाऊ शकते. विशेष म्हणजे या कालावधीनंतर कोणतीही सवलत किंवा मुदतवाढ दिली जाणार नाही. म्हणजे जर तुम्ही ही तारीख चुकवली तर एक जानेवारी नंतर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले समजा. आणि आता ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी मोठी धावपळ करावी लागणार.
ऑनलाइन पॅन आधार लिंक कसे करावे?
- सर्वप्रथम income tax e–filling portal https://www.incometax.gov.in चालू करा.
- होम पेजवर लिंक आधार या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा दहा अंकी पेन आणि बारा अंकी आधार क्रमांक भरा.
- सूचनेचे पालन करा आणि एक हजार रुपये फी ऑनलाईन भरा.
- सबमिट केल्यानंतर काही मिनिटात ही प्रक्रिया पूर्ण होईल.
- ओटीपी साठी आधार सोबत मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
लिंकिंग स्टेटस कसे तपासावे?
- ऑनलाइन स्टेटस तपासण्यासाठी अधिकृत पोर्टल वर जाऊन link Aadhar status पर्याय निवडा पेन आणि आधार कार्ड टाका आणि स्थिति तपासा.
- एसएमएस द्वारे स्टेटस तपासण्यासाठी UIDPAN आधार क्रमांक, पॅन क्रमांक असा मेसेज टाईप करून 567678 किंवा 56161 या नंबर वर पाठवा.
सरकारने आर्थिक प्रगती अधिक मजबूत करण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे. पण वेळेत तुम्ही हे काम पूर्ण केले नाही तर तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. तुमच्या अनमोल जीवनातील फक्त पाच मिनिटांचा वेळ काढा अधिकृत पोर्टलवर लॉग इन करा आणि लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करून घ्या. भविष्यात तुम्हाला तुमचे आर्थिक व्यवहार सुरळीत चालू ठेवायचे असतील तर तुमचे पॅन कार्ड ऍक्टिव्ह असणे खूप आवश्यक आहे. वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा वेळ आहे तोपर्यंत हे काम पूर्ण करून घ्या.