Post Office RD Yojana: देशभरातील लाखो मध्यमवर्गीय कुटुंबाचा आजही पोस्ट ऑफिसच्या योजनेवर खूप विश्वास आहे. कारण पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुमची गुंतवणूक 100% सुरक्षित राहते आणि त्याचबरोबर तुम्हाला चांगला परतावा देखील दिला जातो. अशाच पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांपैकी एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस ची आरडी योजना. या योजनेमध्ये दर महिन्याला थोडी थोडी बचत करून गुंतवणूक करायची आणि एकत्रित मोठे भांडवल निर्माण करायचे. चला तर मग जाणून घेऊया कशाप्रकारे तुम्ही पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता.
आरडी योजना म्हणजे काय?
आरडी योजना म्हणजे recurring deposit म्हणजेच या योजनेत तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करून तुमची बचत दर महिन्याला वाढवू शकतात. पोस्ट ऑफिस ची ही आरडी योजना पाच वर्षासाठी असते. यामध्ये तुम्हाला दरमहा कमीत कमी शंभर रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. सध्या या योजनेमध्ये सरकारकडून 6.70% वार्षिक व्याजदर दिला जात आहे. जो इतर अनेक बँकांच्या एफडी व्याजदरापेक्षा खूप जास्त आहे.
दरमहा 2800 गुंतवल्यास किती रक्कम मिळेल?
जर तुम्ही या योजनेमध्ये दरमहा 2800 गुंतवणूक केली तर पाच वर्षाच्या कालावधीनंतर तुम्हाला मिळणारा परतावा खालील प्रमाणे आहे.
- एकूण गुंतवणूक: 1 लाख 68 हजार रुपये
- एकूण परतावा: 31 हजार 826 रुपये
- मिळणारी एकूण रक्कम: 1 लाख 99 हजार 826 रुपये
म्हणजेच पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेमध्ये अशा पद्धतीने गुंतवणूक करून तुमच्याकडे जवळपास दोन लाख रुपये भांडवल निर्माण होऊ शकते. याचा व्याजदर सरकार ठरवत असल्यामुळे यात कोणताही धोका निर्माण होत नाही. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. Post Office RD Yojana
पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये गुंतवणूक का करावी?
- पोस्ट ऑफिस हे भारत सरकारच्या नियंत्रणाखाली असलेली संस्था आहे त्यामुळे गुंतवणुकीचा धोका निर्माण होत नाही.
- ठराविक व्याजदरामुळे परतावा किती मिळणार हे आधीच ठरलेले असते.
- दरमहा काही हजाराची बचतही पाच वर्षात मोठे भांडवल तयार करू शकते.
- कोणत्याही गुंतवणूकदाराला समजेल अशी सरळ सोपी प्रक्रिया आहे.
- पोस्ट ऑफिसच्या योजना बचतीची शिस्त लावते.
सध्या पोस्ट ऑफिस आरडी योजनेअंतर्गत 6.7% वार्षिक व्याजदर दिला जात आहे. हा व्याजदर प्रत्येक महिन्याला ठरवला जातो. या योजनेवर मिळणारे व्याज करपात्र असते. मात्र गुंतवणूकदाराला नियमितपणे कंपाऊंड व्याज मिळत राहते. आज-काल वाढती महागाई लक्षात घेता आपल्याला मोठी रक्कम गुंतवणूक करता येत नसेल तर प्रत्येक महिन्याला थोडी थोडी बचत करून तीच रक्कम मोठी कशी करता येईल? यासाठी पोस्ट ऑफिसची आरडी योजना सुरू करण्यात आलेली आहे. पैशाची गरज कधी कोणाला कशी लागेल सांगता येत नाही त्यामुळे थोडेफार का होईना पैसे साठवून ठेवलेले कधीही फायद्याचे ठरतात.