Gold Rate Today: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कारण सोन्याचे भाव सलग चौथ्या दिवशी घसरले आहेत. दिवाळीपूर्वी ज्या सोन्याच्या दराने तेजी धरली होती, तेच सोन्याचे दर आता हळूहळू घसरू लागले आहेत. कोणाची किमतीत झालेल्या या घसरणीमुळे सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असणाऱ्यांसाठी दिलासा मिळाला आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करू इच्छित असाल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर हीच सुवर्णसंधी ठरू शकते.
आज 6 नोव्हेंबर 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 21 हजार 620 रुपये एवढा नोंदवला गेला आहे. म्हणजेच गेल्या काही दिवसात सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. मुंबई चेन्नई आणि कोलकाता यातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्राम 1 लाख 11 हजार 340 रुपये एवढा आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतिदहा ग्राम 1 लाख 21 हजार 470 रुपये एवढा नोंदवला गेला आहे. पुणे आणि बेंगलोर या शहरांमध्ये याच पातळीवर दर आहेत. म्हणजेच देशभरातील सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचा फरक स्पष्टपणे दिसत आहे.
सोन्या सोबत चांदीचे दर देखील घसरले
आज फक्त सोन्याचेच दर नाही तर चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. सहा नोव्हेंबर 2025 रोजी चांदीचा दर प्रति किलो 1 लाख 50 हजार 400 रुपये एवढा आहे. जो मागील काही दिवसाच्या तुलनेत खूपच कमी झाला आहे. इंदूर सराफ बाजारात चांदीचा दर प्रति किलो तब्बल 500 रुपयांनी घसरला आहे. सध्या सरासरी दर 1 लाख 48 हजार 500 रुपये प्रतिक्रिया एवढा नोंदवला गेला आहे. चांदीच्या या घसरणीमुळे औद्योगिक व्यापाऱ्यांसाठी तसेच चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा मिळाला आहे.
सोन्याचे दर घसरण्यामागे काय कारण आहे?
सोनं आणि चांदीचा दर जागतिक बाजारातील चढउतारीवर अवलंबून असतात. डॉलरची मजबुती अमेरिकेतील व्याजदरातील हालचाली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतवणूकदाराचा कल यावर सोन्याचे दर अवलंबून असतात. मागील काही दिवसापासून जागतिक बाजारात सोन्याची मागणी काही प्रमाणात कमी झाली आहे त्यामुळे भारतात सोन्याचा दर सातत्याने घसरत आहे. Gold Rate Today
सध्या सोनं आणि चांदी या दोन्ही अनमोल धातूची किंमत काही प्रमाणात स्वस्त झाली आहे. त्यामुळे तुम्ही देखील सोनं आणि चांदी खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी हीच सुवर्णसंधी ठरू शकते. अनेक तज्ञांच्या मते या घसरणीचा फायदा घेत गुंतवणूकदारांनी थोड्या प्रमाणात आपली गुंतवणूक वाढवावी. सोन्याची चमक कमी झाली असली तरी भावनिक दृष्ट्या भारतीयांच्या मनात सोन्याचे स्थान नेहमीच प्रथम असते. आज सोन्या-चांदीच्या किमतीत झालेली घसरण पाहून सर्वसामान्यांना छोटासा का होईना दिलासा मिळाला आहे.