सोयाबीन बाजार भावात तुफान वाढ; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन दर पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Market Price : सोयाबीन उत्पादक शेतकरी आहात? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे यंदाचा बाजार भावाबाबत. खरंतर ही बातमी शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची ठरणार आहे कारण गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हवा इतका दर भेटत नव्हता परंतु सध्या शेतकऱ्यांचे दिवस येणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य भाव मिळणार आहे चला तर जाणून घेऊया नवीन बाजार भाव काय आहेत आणि भाव भविष्यात कसे राहतील. Soybean market price

मागच्या तीन वर्षापासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या हातात सारखी निराशा येत होती. परंतु यंदा प्रथमच दरामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ अशा प्रचंड नुकसानी मधून शेतकरी या पिकांची शेती करतो. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, या भागात सोयाबीन मोठ्या प्रमाणामध्ये पिकवली जाते.

परंतु गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन या पिकाला अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन सोडून अनेक पिकं फायदेशीर असल्याचं म्हणत त्याची शेती केली आहे. परंतु तसं असलं तरी यंदा देखील मोठ्या प्रमाणात सोयाबीन या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. परंतु आता सोयाबीन पिकाला हमीभाव पेक्षा खुल्या बाजारात अधिक दर मिळत असल्याचा समोर आलेल आहे आणि यामुळे शेतकरी बांधव सध्या समाधान व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रातील काही प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला चांगल्या प्रकारचा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरला आहे.

आज राज्यातील काही भागांमध्ये चांगल्या सोयाबीनला सात हजार रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाला आहे त्यामुळे शेतकरी बांधव सध्या समाधान व्यक्त करत आहेत. अकोला लातूर, वाशिम या सारख्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाला आहे. चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समितीमध्ये किती भाव मिळाला आहे त्यासाठी खालील दिलेल्या लेख वाचा.

या बाजार समितीमध्ये मिळाला सर्वाधिक दर

सोयाबीन बाजार भाव बाबत बोलायचं झाल्यास सोयाबीनला चांगला भाव मिळालेला आहे. सध्या सोयाबीनला कमाल 7330 रुपये प्रतिक्विंटल आणि सरासरी 6500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळालेला आहे. परंतु किमान भाव तीन हजार 925 रुपये एवढा होता. या बाजारात मध्ये साडेचार हजार क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झालेली आहे.

तर तसेच अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इथे देखील पिवळी सोयाबीन ४६०२ क्विंटल आवक झाली असून, चांगल्या सोयाबीन मालाला पाच हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला असून सरासरी 5525 रुपये प्रतिक्विंटल असा होता. तसेच किमान दर चार हजार रुपये प्रति क्विंटल असे मिळालेला आहे. सध्या बाजार भाव बाबत बोलायचं झाल्यास बाजार भाव चांगले मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे तर काही तज्ञ सांगतात भविष्यामध्ये बाजार भाव आठ हजार रुपयांच्या वर जातील यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे परंतु आता हा भाव कधी मिळतो याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!