Kanda Bajar Bhav | सध्या राज्यामध्ये कांद्याची आवक चांगली सुरू झालेली आहे. नऊ नोव्हेंबर रोजी म्हणजे रविवारी तब्बल पन्नास हजार क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे. कांदा राज्यातील विविध बाजारात दाखल झालेला असून सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये गाड्यांच्या रांगा लागलेल्या होत्या, व्यापारी मंडळ चक्कर मारत होते आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती तर काय मिळतो याचा उत्सुकता होती. Kanda Bajar Bhav
या दिवसात कांद्याचे दर काही ठिकाणी 500 रूपांपासून सुरू होऊन 1800 रुपयांपर्यंत पोहोचले. उन्हाळा कांद्याला अकोला बाजारात किमान 250 रुपये आणि सरासरी 1300 रुपयांचा दर मिळाला. पारनेर बाजारात सरासरी 1350 रुपये, तर भुसावळ बाजारामध्ये बाराशे रुपये दर नोंदवला आहे.
पुणे बाजार मध्ये लोकल कांद्याला पाचशे रुपये ते 1150 रुपये दर मिळत आहे. पुणे पिंपरी येथे सरासरी 1300 रुपये, तर मंगळवेढा बाजारात केवळ सहाशे रुपयांपर्यंत दर मिळाल्याने शेतकरी थोडे नाराज दिसले. धाराशिव बाजारात लाल कांद्याला सरासरी 1150 रुपये आणि जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याला तब्बल पंधराशे रुपये पर्यंत भाव मिळाला नाही तिकडेच शेतकरी खुश दिसले.
छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये 3170 क्विंटल कांद्याचे आवक झाले असून 600 ते 1600 रुपये दरम्यान राहिला आहे. दौंड-केडगाव येथे ३२०७ क्विंटल आवक झाली आणि भाव २०० ते १८०० रुपयांपर्यंत गेले. साताऱ्यात कांद्याला तब्बल २००० रुपयांचा सर्वोच्च दर मिळाला, त्यामुळे शेतकरी हसत घरी गेले म्हणायचं
जुन्नर आळेफाटा येथे चिंचवड कांदा १००० ते १८५० रुपयांपर्यंत विकला गेला. धाराशिव बाजारात लाल कांदा ५०० ते १८०० रुपयांदरम्यान, तर पुण्यात लोकल कांद्याला ५०० ते १८०० रुपये दर मिळाल्याचं नोंदवलं गेलं आहे. पुणे-खडकीत ७०० ते १२०० रुपये, पिंपरीत १००० ते १६०० रुपये, तर मोशी बाजारात कांद्याचा भाव ४०० ते १६०० रुपयांदरम्यान राहिला.
हे पण वाचा | आजचा कांदा बाजार भाव (16 ऑक्टोबर 2025)