Astrology Prediction: आपल्यापैकी प्रत्येकाच्या स्वप्न असतं की आपल्याला परफेक्ट जोडीदार मिळावा, जो आपलं भावना समजून घेईल आणि जीवनाच्या प्रवासात खांद्याला खांदा लावून साथ देईल. मात्र अनेक वेळा असं होत नाही, आपण आपल्या जीवनाचा जीवनसाथी निवडतो पण तो काही काळातच अर्ध्यावर साथ सोडतो. प्रेम कमी पडतं, भांडण जास्त होतात अशावेळी नात्यातला ताण मोठ्या प्रमाणात वाढतो आणि ती नाती अर्ध्यावर संपतात. ज्योतिष शास्त्र सांगत की, प्रत्येक राशींच्या लोकांचे वेगळे स्वभावमूल्य असते. काही अग्नी प्रमाणे जळणारे काही पाण्यासारखे शांत काही वाऱ्यासारखे चंचल तर काही पृथ्वीप्रमाणे स्थिर असतात. मात्र जेव्हा दोन वेगळी तत्व एकत्र येतात तेव्हा त्या नात्यांमध्ये संघर्ष निर्माण होतो. चला पाहूया त्या राशींच्या जोड्या ज्या कितीही प्रयत्न केल्या तरी एकत्र राहू शकत नाही.
- मेष आणि कर्क —
मेष राशीतील लोक जोशात काम करणारे आहेत. ठाम निर्णय घेणारे आणि आता नाहीतर कधीच नाही असे म्हणणारे असतात. तर कर्क राशीचे लोक भावनिक जपून पाऊल टाकणारे आणि घराला सर्वस्व मानणारे असतात. दोघांचं नातं सुरुवातीला गोड असला तरी लवकरच यामध्ये कडूपणा निर्माण होतो. मेसला कर्काची माया गुदमरल्यासारखी वाटते तर कर्कला मेषचा बेफिकीर स्वभाव त्रासदायक वाटतो. परिणामी या दोघांच्या प्रेमाची जागा गैरसमज घेतो आणि शांततेच्या जागी राग निर्माण होतो. यामुळे या दोन्ही राशी मधील विवाह संबंध कधीच आयुष्यभर टिकत नाही.
- वृषभ आणि कुंभ —
वृषभ राशीतील लोक स्थिर आयुष्य घर कुटुंब आणि आराम या गोष्टींना प्राधान्य देतात. कुंभ राशीतील लोक मात्र नव्या कल्पना सामाजिक प्रयोग आणि मोकळा आकाश शोधत असतात. वृषभ राशीतील लोकांना कुंभ राशीतील लोकांचे वागणे अस्थिर वाटते. सर कुंभ राशीतील लोकांना वृषभ राशीतील लोकांचे वागणे हट्टपणा वाढतो. परिणामी दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. कोणीही मागण्यास तयार होत नाही आणि शेवटी त्यांचं नातं तुटत. Astrology Prediction
3.मिथुन आणि कन्या —
मिथुन राशीचा माणूस एकाच वेळी 10 विचार करतो अनेक विषयावर बोलतो आयुष्याचा आनंद घेतो. कन्या मात्र परफेक्टनिस्ट व्यवस्थाप्रेमी आणि प्रत्येक गोष्टीत टीका करणारी. दोघे बुद्ध ग्रहाचे असले तरी एकाच ग्रहाचे विचारमूल्य वेगळे असू शकते. मिथुन ला बदल हवे, कन्याला नियम हवे असतात. परिणामी चांगला संवाद वादात बदलतो आणि दोघांमधील प्रेम हळूहळू कमी होते. यामुळे या राशीमधील देखील नातेसंबंध जास्त दिवस टिकू शकत नाही.
- सिंह आणि वृश्चिक —
सिंह राशीच्या माणसांना प्रकाशझोतात राहायला आवडते त्याला आदर आणि स्तुती आवडते. वृश्चिक राशीतील लोक मात्र गुप्त नियंत्रण प्रेमी आणि गुढ असतो. दोघेही ताकतवान पण वेगळ्या दिशेने प्रवास करत असतात. सिंह उघडपणे राज्य करतो, तर वृश्चिक पडद्यामागून राज्य करतो. परिणामी दोघांच्याही अहंकारात टक्कर निर्माण होते आणि या अहंकारा पायी त्यांचं नातं जळून खाक होते. त्यामुळे या दोघांमधील नाते देखील आयुष्यभर टिकू शकत नाही.
- मकर आणि तूळ
मकर राशीतील लोक व्यावहारिक शिस्तप्रिय आणि करिअर केंद्रित असतात. तर तूळ राशीतील लोक आकर्षक सामाजिक आणि सौंदर्यप्रेमी असतात. मकर ला तुळशी पार्टी आणि मोकळं वागणं व्यर्थ वाटतं तर तुला मकरच थंड स्वभाव सहन होत नाही. परिणामी हळूहळू दोघांच्या नात्यांमध्ये अंतर वाढते आणि शांत घरात देखील तणाव निर्माण होतो. यामुळे या दोघांमधली नाती देखील कधीच टिकू शकत नाही.
Disclaimer: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. ज्योतिषावर विश्वास ठेवायचा का नाही हे पूर्णपणे तुमचे वैयक्तिक मत आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.