SBI HOME LOAN : सध्याच्या घडीला घर बांधण्याचे प्रत्येकाचे स्वप्न आहे, परंतु दैनंदिन गरजा मुलांचे शिक्षण, दवाखाने, आणि इतर खर्च वाढत चाललेल आहे. या महागाईच्या काळामध्ये घर बांधणे हे स्वपनच राहत आहे. परंतु जर तुम्ही घर बांधण्यासाठी होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण आता भारतातील मोठी आणि नामांकित स्टेट बँक ऑफ इंडिया घर बांधण्यासाठी होम लोन उपलब्ध करून देत आहे. तेही कमी व्याजदरामध्ये परंतु यासाठी आपल्याला कसा अर्ज करायचा कागदपत्र कोणते लागणार हे एकदा जाणून घेऊया. SBI HOME LOAN
भारतीय रिझर्व बँकेने 2025 मध्ये रेपो रेटमध्ये एक टक्क्यांची कपात केली आहे. आरबीआयने रेपो रेट कपात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे देशभरातील बँकेने होम लोन सहित सर्वच प्रकारच्या कर्जाचे व्याजदर कमी केलेले आहे. यामुळे ज्या नागरिकांचे घर बांधण्याचे स्वप्न होते, त्यांचे आता पूर्ण होणार आहे आणि त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आरबीआयच्या या नवीन निर्णयामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांसाठी 7.50% व्याजदरामध्ये होम लोन देण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. जर तुम्ही घर बांधण्यासाठी 30 लाख रुपयांपर्यंत होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर किती व्याजदर लागेल आणि तुमचा पगार किती असायला हवा ही एकदा जाणून घ्या.
तीस लाखांच्या होम लोन साठी पगार किती ?
जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत तीस लाख रुपये पर्यंत होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षाच्या मुदतीसाठी तीस लाख रुपयांचे गृह कर्ज घ्यायचे असेल तर पगार तुमचा 42 हजार रुपये असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या नावावरील तर कोणतीही सक्रिय कर्ज नसावी आणि इतर कर्ज सुरू असेल तर अशा प्रकरणात बँकेकडून कर्ज मंजूर केले जात नाही.
स्टेट बँक ऑफ इंडिया कडून किमान 7.50% इंटरेस्ट रेटवर 30 वर्षासाठी 30 लाख रुपयांचे होम लोन मंजूर झाल्यावरती तुम्हाला 21 हजार रुपये EMI भरावा लागेल. परंतु हे कर्ज 750 पेक्षा अधिक सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना तसेच सुरक्षित नोकरी असणाऱ्या ग्राहकांना देण्यात येत आहे जर तुम्ही यासाठी पात्र असाल तर अर्ज करू शकता आणि तुमच्या स्वप्नातील घर बांधू शकता.
हे पण वाचा | आनंदाची बातमी! SBI ने होम लोनच्या दरात केली मोठी कपात, आता घर घेणं होणार अधिक सोपं