Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानामध्ये मोठा बदल झालेला असून गेल्या काही दिवसांपासून अक्षर चा उलटपालट झालेला आहे. काही ठिकाणी अजूनही रिमझिम पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी थंडी एवढी वाढली आहे की पहाटे अंग गारठून जातंय. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच थंडीचा कडाका वाढला आणि आता पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे. बारा आणि १३ नोव्हेंबर रोजी राज्यात सहदेशाभरामध्ये मोठा हवामानाल बदल होणार असल्याचे सांगितण्यात आला आहे. Maharashtra Weather Update
भारतीय हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार उत्तर भारतात आता जोरदार थंडीची लाट सुरू होणार आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि चंदीगड या भागात पुढील २४ तासांमध्ये कडाक्याच्या थंडीचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर महाराष्ट्रातही हवामानात झपाट्याने बदल होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता थंडीने जोर पकडला आहे. धुळे, जळगाव, निफाड, नाशिक, परभणी, जेऊर या भागांमध्ये तापमानात मोठी घट झाली असून पहाटेच्या वेळेला गार वारे सुटले आहेत. पुण्यात गेल्या २४ तासांत १३.४ अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान नोंदवलं गेलं आहे. म्हणजेच आता थंडीचा कडाका अजून काही दिवस वाढणार हे स्पष्ट आहे.
त्यातच केरळच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे देशभरात ढगांचे प्रमाण वाढले असून दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये म्हणजे तामिळनाडू आणि केरळमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रावरही पडू शकतो, असं हवामान खातं सांगतंय.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील किमान तापमान ४ ते ५ अंशांनी घसरणार आहे. म्हणजेच थंडीचा कडाका आणखी तीव्र होणार आहे. सकाळी शेतात जाणं कठीण होईल, पाणी थंडगार होईल, आणि अंगावर गारवा जाणवेल असा काळ सुरू होणार आहे. गावोगाव शेकोट्या पेटतील, लोक उबेसाठी बसतील अशी स्थिती लवकरच दिसणार आहे.
हवामान विभागाने नागरिकांना सल्ला दिला आहे की पुढील काही दिवस विशेष काळजी घ्यावी. थंडीमुळे सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणं वाढू शकतात, त्यामुळे लहान मुलं आणि वृद्धांनी घराबाहेर कमी पडावं. उबदार कपडे वापरावेत आणि सकाळच्या थंड वाऱ्यापासून बचाव करावा.
सध्या नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर येताच वातावरणातल्या बदलाची चाहूल लागली आहे. एकीकडे उत्तर भारतात बर्फाळ थंडीचा प्रवास सुरू होतोय तर दुसरीकडे महाराष्ट्रात पावसाचं सावट अजून संपलेलं नाही. त्यामुळे येणारे काही दिवस राज्यासाठी हवामानाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.
हवामान विभागाने दिलेला इशारा स्पष्ट सांगतोय १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी राज्यातील नागरिकांनी सावधान राहावं, थंडी आणि पावसाचा संयुक्त तडाखा बसू शकतो.
हे पण वाचा | राज्यावरती पुन्हा एकदा चक्रीवादळाचा फटका; या 11 जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस वाचा सविस्तर