Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकार अंतर्गत एक महत्त्वाची योजना राबवण्यात येत आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, या योजनेमध्ये महिलांना मोठा आर्थिक लाभ मिळत आहे. खरतर ही योजना एक प्रकारे महिलांसाठी व ठरत आहे. कारण या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्यातील दीड हजार रुपये मिळतात ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये सुरू करण्यात आली. Ladki Bahin Yojana
आतापर्यंत महिलांच्या खात्यावरती दर महिन्याला पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात जमा होत आहेत. ही योजना जुलै 2024 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसा यशस्वीरित्या जमा करण्यात आलेली आहे.
सध्या राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहेत आणि याचा रणसंग्राम सुरू असतानाच एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. ती म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार. तर अशातच महिलांसाठी एक महत्त्वाची आणि कामाची अपडेट समोर आलेले आहे. तर तुम्ही देखील या योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी नक्की वाचा.
राज्य शासनाने या योजनेमध्ये महत्त्वाचे नियम लागू केलेले आहेत आणि हे नियम जर तुम्ही पाळत नसाल तर तुम्ही नक्कीच अपात्र ठरणार आहात. कारण या योजनेमध्ये अनेक बोगस लाभार्थी आढळलेले आहेत त्यामुळे सरकारने लाभार्थ्यांना वगळण्यासाठी इ -Kyc प्रक्रिया अनिवार्य केली आहे.
तर यासाठी शासनाने राज्यस्तरावरती केवायसी प्रक्रियेची अंमलबजावणी केली आणि सगळीकडे केवायसी चा धुमाकूळ सुरू झाला. कोणती ही इ केवायसी करत असताना महिलांना अनेक तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत होता आणि शासनाने १८ नोव्हेंबर ही शेवटची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे कधी सर्व डाऊन होतो, तर कधी ओटीपी मिळत नाही अशा समस्या वारंवार समोर आलेल्या होत्या त्यामुळे महिलांमधून देखील निराशा समोर आलेली होती या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहेत. त्यांनी सांगितला आहे की लाडकी बहीण योजनेची वेबसाईट काही आवश्यक तंत्रिक बदल केलेले आहेत.
त्यामुळे केवायसी प्रक्रियेला थोडासा वेळ लागत आहे मात्र समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी सुधारणा करून सुरू होणार आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांचे पती किंवा वडील हयात नाही त्यांना पण केव्हाशी करताना अडचणी येत होते. पण आता या अडचणी दूर झालेले आहेत मंत्री यांनी सांगितला आहे की ज्या महिलांचा पती किंवा वडिलांचा मृत्यू झालेला आहे असा महिलांसाठी वेबसाईटवर विशेष पर्याय जोडला जात आहे. त्यामुळे महिलांना लवकरच या तांत्रिक अडचणीमध्ये बदल करून नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे काही दिवस महिलांना वाट पाहावी लागणार आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींनो, बँक खातं तपासा! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात..