IMD Rain Alert : सध्या महाराष्ट्र मध्ये गणेश उत्सवासारखे सणासुदीचे दिवस अगदी उंबरठ्यावर ठेपले असतानाच, राज्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याने एक महत्त्वाचा अंदाज जाहीर केलेला आहे. शेतकऱ्यांना एकीकडे पावसाची मोठी ओढ लागलेली असताना पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यासाठी मात्र पुढील तीन ते चार दिवस चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आज भारतीय हवामान खात्याने (IMD Alert) दिलेल्या ताज्या अपडेटनुसार गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांना पुढील 72 तासांसाठी मोठा इशारा जारी केला असून पश्चिम विदर्भातील काही भागात मात्र हलका पावसाची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया भारतीय हवामान खात्याचा नवीन ताजी अपडेट. IMD Rain Alert
नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात एक नवीन प्रणाली तयार झाली असून, ती हळूहळू पुढे सरकत आहे. याचा थेट परिणाम पूर्व विदर्भातील हवामान होण्याची शक्यता असल्याने, काही भागात चांगला तर काही ठिकाणी साधारण पाऊस पडू शकतो. मात्र इथे एक गंभीर आकडा लक्षात घ्यावा लागणार आहे ऑगस्ट महिन्यात विदर्भातील पावसाची तूट तब्बल 70% पर्यंत पोहोचलि आहे. त्यामुळे आगाम काही दिवसातील हा पाऊस शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
राज्यात मोठी पावसाची तूट?
केवळ विदर्भापूर्तीची समस्या मर्यादित नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्याचा प्रमाण अपेक्षा अपेक्षा खूपच कमी राहिले आहे. अनेक भागात 50% पेक्षा अधिक पावसाची तुट निर्माण झाली असून, याचा थेट आणि गंभीर परिणाम शेतीवर होताना दिसत आहे. शेतकऱ्यासमोर बिकट परिस्थिती उभी राहिली. हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवसात विदर्भातील तुरळ भागात पाऊस होण्याची शक्यता असली तरी मात्र राज्यातील एकंदरीत पावसाचा प्रमाण पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे.
तसेच ऑगस्ट महिन्यात देखील मोठी पावसाची तूट पडलेली आहे. आणि पुढे सप्टेंबर महिन्यात देखील पावसाचा प्रमाण कमी राहणार असल्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवलेली आहे. आता येणार काळ शेतकऱ्यांसाठी खूपच चिंताजनक ठरणार आहे. दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील मोठ्या भूभागात पावसाची तूट अजूनही कायम आहे. त्यामुळे बळीराजा येत्या काळात आणखी अडचणी सापडण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे.
गणेशउत्सवासारखे सण जवळ येत असताना शेतकरी कुटुंबासाठी हा काळ नेहमी आनंदाचा आणि उत्साहाचा असतो. मात्र यंदा शेती शिवारातील पावसाची ही मोठी तूट हा आनंदावर विरजण घालणारी ठरते. सणसुदीचा खर्च आणि शेतीतील उत्पन्नाचे अनिश्चितता या दोन्ही ताळमेळ बसवताना शेतकऱ्यांना मोठी कसोटी करावी लागते. अशावेळी पूर्व विदर्भ होणारा हा पाऊस काही प्रमाणात का होईना सनासुदीच्या तोंडावर एक आशेचा किरण ठरू शकतो.
( टिप: वरील माहिती हवामान विभाग नागपूर हवामान केंद्र आणि हवामान तज्ञांनी दिलेल्या अंदाजावर आधारित आहे. सध्या स्थानिक हवामानाच्या माहितीसाठी IMD च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.)
हे पण वाचा : 15 जून 2025 पासून पावसाचे रूप बदलणार: पंजाबराव डख यांचा अचूक हवामान अंदाज..
