Maharashtra Rain | अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान केले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भासह मराठवाड्या लगतच्या काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले.
अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडलेली दिसून येत आहे यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते व शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसला होता.
सोमवारी रात्री राज्यामध्ये अनेक भागात अवकाळी पावसाचा गारपीट मोठ्या प्रमाणात झाली. तसेच वादळी वाऱ्यासह अनेक भागांमध्ये गारांचा पाऊस आणि रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केले आहे. या झालेल्या अचानक पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्याच्या स्थितीला शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची मोठी गरज आहे.
जालना जिल्ह्याचा जळगाव नांदेड बुलढाणा जिल्ह्यामध्ये रात्री वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे गहू हरभरा ज्वारी व फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले दिसून येत आहे. या भागामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे असून, आता या अवकाळी पावसाने बळीराजा मोठा चिंतेमध्ये सापडलेला दिसून येत आहे शेतकऱ्यांचे यापूर्वीही अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला होता.
जाफराबादीतील सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे अतोनात पिकांचे नुकसान केले आहे. जाफराबाद येथील गोंधनखेडा, नळविहिरा, सांगवी, टेंभुर्णी, खामखेडा, डावरगाव देवी, भातोडी, सावरगाव मस्के, भातोडी दहिगाव, हिवरकाचली, कुंभारझरी खानापूर, निमखेडा, खुर्द, आंबेगाव, डाकेवाडी, गडेगव्हाण, अकोल देव, पूर्णा नदी सांगवी, या भागांमध्ये गारांचा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गहू हरभरा शालू ज्वारी तसेच मका नेटशेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहेत तर शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी देखील मागणी केली जात आहे. या झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणी सापडला आहे.
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले पीक चक्क मातीमोल झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास संकटामुळे हिरपून घेतला असल्याचे चित्र सध्या शेतकरी वर्ग मधून दिसून येत आहे. तसेच शासनाच्या माध्यमातून तात्काळ शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी देखील मागणी होत आहे. आता हे पाहणे गरजेचे आहे की शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून कधी मदत देण्यात येते. कारण यंदा शेतकऱ्यांसाठी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी सर्वात गोष्टींमध्ये अडचणीत आलेला दिसून येत आहे.
1 thought on “शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान, जालना जळगावसह या भागात जोरदार गारपीट”