Free ration date : ऑक्टोबर महिन्यामध्ये 5 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीमध्ये नागरिकांना मोफत रेशन कार्ड वाटप करण्यात आले आहे. या कालावधीत पात्र घरगुती शिधापत्रिकाधारकांना 2 किलो आणि 3 किलो तांदूळ युनिट द्वारे मोफत वाटप करण्यात येणार आहे. Free ration date
ऑक्टोबर महिन्यासाठी मोफत रेशन वाटप पासन सुरू झालेले आहे. पाच ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान नागरिकांना या कालावधीत प्रति युनिट पाच किलोच्या दराने दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे अंतोदय ग्राहकांना प्रति कार्ड 35 किलो रेशन मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सर्व शिधापत्रिकाधारकांना ऑक्टोबर महिन्यात स्वस्त दुकानदार माध्यमातून 5 ते 25 ऑक्टोबर दरम्यान जीवनावश्यक वस्तू मोफत वाटप करण्यात येणार आहे. अंतोदय शिधापत्रिकाधारकांना 14 किलो गहू प्रती शिधापत्रिका व तांदूळ प्रति रेशन कार्ड 21 किलो दराने व पात्र घरगुती शिधापत्रिकाधारकांना गहू दोन किलो व तांदूळ तीन किलो दराने वितरित करण्यात येणार आहे.
तसेच शिधापत्रिकाधारकांना ज्यांचे आधार कार्ड काही कारणामुळे बनले नाही किंवा ज्यांचा अंगठा/डोळा ई – पास मशीनने स्वीकारला नाही अशा शिधापत्रिकाधारकांना पंचवीस ऑक्टोबर रोजी मोबाईल ओटीपी द्वारे पडताळणी करून जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार आहे.