Aadhaar Card New Rules: भारतामध्ये प्रत्येकांकडे आधार कार्ड असणे अत्यावश्यक आहे. सरकारी योजना असो किंवा बँकेत व्यवहार करायचा असतो किंवा मुलांना शाळेत दाखला घ्यायचा असो प्रत्येकांसाठी आधार कार्ड अतिशय आवश्यक आहे. पण याच आधार कार्ड मध्ये काही बदल करायचा असला की नागरिकांना आधार केंद्रावर रंगीत उभे राहावे लागत आहे. अपॉइंटमेंट मिळत नाही आणि लहान स्थान चुका सुधरवण्यासाठी दिवसान दिवस वाट पहावी लागत आहे. मात्र आता या सर्व त्रासावर नवीन बदल करण्यात आला आहे. UIDAI ने एक नोव्हेंबर 2025 पासून आधार कार्ड प्रक्रियेत काही मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि हे बदल नागरिकांना मोठा फायदा देणार आहेत.
याआधी आधार कार्ड मध्ये नाव पत्ता जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर बदलवण्यासाठी आदर्श सेवा केंद्रामध्ये जावा लागत असे. तेथे रांगा फॉर्म भरणे ओटीपी डॉक्युमेंट अपलोड अशा अनेक प्रक्रिया पूर्ण करून आधार अपडेट करावी लागत असे. मात्र एक नोव्हेंबर 2025 पासून UIDAI ने मोठे पाऊल उचलले आहे. आता नागरिकांना हे सर्व बद्दल थेट ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. म्हणजेच नागरिकांना आता आधार केंद्रात जाण्याची गरज भासणार नाही यामुळे त्यांचा वेळ वाचणार आहे. मात्र बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर जाणे आवश्यक आहे.
आतापर्यंत नाव किंवा पत्ता बदलावण्यासाठी नागरिकांना शाळेचे कागदपत्र रेशन कार्ड पॅन कार्ड आणि पासपोर्ट अपलोड करावे लागत होते. अनेक वेळा कागदपत्र न जो आल्यामुळे अपडेट नाकारले जात असे. मात्र आता UIDAI ने नवीन बदल केला आहे. एक नोव्हेंबर पासून सरकारी डॉक्युमेंट मधून जसे की पॅन कार्ड पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन रेशन कार्ड जन्म दाखला मनरेगा कार्ड इत्यादी कागदपत्रांच्या आधारे तुमची माहिती तपासली जाणार आहे. म्हणजेच कागदपत्र अपलोड करायची गरज भासणार नाही यामुळे वेळ आणि त्रास दोन्ही वाचणार आहे.
किती शुल्क आकारले जाणार?
UIDAI ने आधार अपडेट चे शुल्क देखील एक नोव्हेंबर पासून वाढवले आहेत. नवीन दर खालील प्रमाणे आहेत, नाव पत्ता मोबाईल नंबर बदलण्यासाठी अगोदर पन्नास रुपये शुल्क आकारला जात होता मात्र आता 75 रुपये शुल्क आकारला जाणार आहे. फोटो बोटाचे ठसे आयरिस अपडेट साठी पूर्वी शंभर रुपये शुल्क आकारला जात होता मात्र आता 125 रुपये करण्यात आला आहे. पाच ते सात आणि पंधरा ते सतरा वयोगटातील मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट पूर्णपणे निशुल्क आहे.
आधार पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख
UIDAI नेम पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 आहे. जर ही लिंकिंग त्या आधी केले नाही तर तुमचं पॅन कार्ड अवैध ठरणार आहे आणि पुढील आर्थिक व्यवहारांमध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ज्यांनी अजून आधार आणि पॅन लिंक केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. Aadhaar Card New Rules
या नवीन नियमामुळे नागरिकांना अधिक सुलभ सोयी आणि दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर सरकारलाही नागरिकांची अचूक माहिती ठेवता येणार आहे. डिजिटल इंडिया मोहीमच्या दिशेने हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. आधार कार्ड मधील चूक दुरुस्त करण्यासाठी लागणारा वेळ आणि त्रास कमी होणार आहे. आधार कार्ड हे फक्त ओळखपत्र नाही तर आता प्रत्येकांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाचे बनले आहे. म्हणूनच या बदलाकडे फक्त नियम म्हणून नाहीतर डिजिटल भारत या स्वप्नाकडे टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
 
					 
		
1 thought on “Aadhaar Card New Rules: १ नोव्हेंबर पासून आधार कार्डसंबंधित सगळ्यात मोठा बदल; या नागरिकांना मिळणार मोठा फायदा”