Aadhar Card New Update: आधार कार्ड हे आता प्रत्येक भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचा कागदपत्र बनला आहे. आधार कार्ड शिवाय एखाद्या व्यक्तीची ओळख पटवणं अवघड झाला आहे. शाळेत प्रवेश घ्यायचा असो किंवा बँकेत खाते उघडायचे असो किंवा सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो आधार कार्ड दाखवणे आवश्यक आहे. देशातील तब्बल 140 कोटी नागरिकांकडे आधार कार्ड आहे पण अनेकांनी अजूनही त्यातील अपडेट बाबतचे नियम पूर्णपणे जाणून घेतले नाहीत. अनेक वेळा आपण आधार कार्ड वर छोट्या चुका दुर्लक्ष करतो. जसं की एखादं अक्षर चुकीचं जन्मतारीख थोडीफार तुटलेली किंवा पत्त्यात एखादा शब्द वगळला पण या छोट्या चुकांमुळे मोठ्या संकट उभे राहू शकत. कारण आधार कार्ड हे तुमच्या प्रत्येक व्यवहाराशी जोडलेली आहे. बँक पेन गॅस सबसिडी पेन्शन सरकारी योजना म्हणूनच UIDAI काही नियम घातले आहेत.
ही माहिती बदलता येते
UIDAI नागरिकांना आधार वरील काही माहिती बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देते. ऑनलाइन किंवा जवळच्या आधार केंद्र मध्ये जाऊन तुम्ही खालील माहिती सहजपणे बदलू शकतात. मात्र ही माहिती बदलण्यासाठी तुमच्याकडे त्या संबंधित पुरावा असणं महत्त्वाचे आहे. Aadhar Card New Update
- नाव (Name)
- जन्मतारीख (Date Of Birth)
- लिंग (Gender)
- मोबाईल नंबर (Mobile No)
- पत्ता (Address)
मात्र लक्षात ठेवा आधार वरील सर्व माहिती पुन्हा बदलता येत नाही. UIDAI च्या नियमानुसार काही माहिती फक्त एकदाच किंवा दोनदाच बदलता येते. यामध्ये नाव जन्मतारीख आणि लिंग ही माहिती तुम्ही फक्त एकदाच बदलू शकतात. पत्ता मात्र तुम्ही हवे तितके वेळा अपडेट करू शकता कारण राहण्याचे ठिकाण वेळोवेळी बदलू शकते. त्यामुळे युआयडीएआयने पत्ता बदलण्यासाठी कोणतीही मर्यादा घातली नाही. म्हणूनच नाव किंवा जन्मतारीख अपडेट करताना फार काळजी घेणे आवश्यक आहे. एकदा चुकीची माहिती अपडेट झाली तर नंतर सुधारणा करण्याची संधी मिळत नाही. मग प्रत्येक सरकारी कामात ती चूक तुम्हाला पुन्हा पुन्हा त्रास देते.
आधार अपडेट करताना या गोष्टी लक्षात ठेवा
- नाव पत्ता किंवा जन्मतारीख बदलताना योग्य पुरावे जसे की पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे. मराठीत किंवा इंग्रजीत नावाची स्पेलिंग चुकीचे टाकू नका.
- ऑनलाइन अर्ज करत असताना ब्राउझर मध्ये भाषेची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण अनेक वेळा टायपिंग मध्ये चुका होतात.
- आधारशी जोडलेला मोबाईल नंबर बंद असेल तर ओटीपी मिळत नाही त्यामुळे मोबाईल नंबर अपडेट ठेवणे आवश्यक आहे.
आधार मध्ये चुकीची माहिती दिल्यास काय होते?
अनेक जण बनावट कारण दाखवून माहिती बदलण्याचा प्रयत्न करतात. नाव थोडं बदलायचे जन्मतारीख कमी जास्त करायची, कधी लिंग बदलायचं आहे. पण UIDAI आता अशा प्रकारावर कडक पाऊल उचलत आहे. आधार अपडेट मध्ये तुमचा अर्ज चुकीचा आढळल्यास तो थेट रिजेक्ट केला जाऊ शकतो आणि पुढे अपडेटची संधी कायमची बंद केली जाऊ शकते. त्यामुळे चुकीची माहिती असल्यास कोणीही तुमच्या आधार चा दुरुपयोग करू शकतो. फसवणूक बनावट खाते उघडणं किंवा कर्ज घेणे हे सर्व शक्य होऊ शकते म्हणून आधार मध्ये बदल करताना जरा विचार करून करा.