Add new name to ration card : नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही देखील तुमच्या फॅमिली मेंबर चे नाव तुमच्या रेशन कार्ड मध्ये ऍड करण्याचा विचार करत असाल आणि कशा प्रकारे तुम्हाला ऍड करायचे आहे? हे माहीत नसेल तर हा लेख सविस्तरपणे वाचा. कारण आम्ही तुमच्यासाठी अशीच एक बातमी घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही सोप्या पद्धतीने तुमच्या फॅमिली मेंबर चे नाव ऍड करू शकता. Add new name to ration card
मित्रांनो अनेक वेळा आपल्याला तहसीलमध्ये चकरा मारावे लागतात परंतु आपले नाव ॲड होत नाही. अशा वेळेस आपल्याला अडचण निर्माण होते. कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ आपल्याला घेता येत नाही. तर यासाठी तुम्ही आता सरकारने सुरू केलेला ऑनलाइन पद्धतीचा वापर केला पाहिजे. ही पद्धत वापरून तुम्ही तुमच्या रेशन कार्ड मध्ये नवीन पद्धतीने नाव लावू शकता. त्यासाठी खाली दिलेली पद्धत वापरा.
तुम्हाला “मेरा रेशन 2.0” हे अॅप डाउनलोड करावं लागेल. गुगल प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरमध्ये जाऊन ‘Ration Card’ किंवा ‘Mera Ration 2.0’ असं सर्च करा. अॅप इंस्टॉल केल्यानंतर ओपन करा.
1. लॉगिन करा आधार कार्ड टाका, आणि तुमच्या नंबरवर आलेला OTP भरा.
2. फॅमिली डिटेल्स ऑप्शन निवडा.
3. तिथं ‘Add New Member’ वर क्लिक करा.
4. नविन सदस्याची सगळी माहिती टाका नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक.
5. सर्व तपशील तपासून ‘Submit’ करा.
बस्स! काम झालं. थोड्या वेळात तुमच्या कुटुंबातला तो सदस्य रेशन कार्डात दिसू लागेल.
ऑफलाइन पद्धत अजूनही उपलब्ध
ज्यांना मोबाईल अॅप वापरणं कठीण वाटतं, त्यांनी जवळच्या अन्नपुरवठा कार्यालयात जावं. तिथं अर्ज भरून, आधार कार्डची प्रत जोडून अर्ज द्या. अर्जाच्या बदल्यात तुम्हाला पावती मिळेल. कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर नाव कार्डात समाविष्ट होईल.
हे पण वाचा | मोठी खुशखबर! महिलांना मिळणार रेशन कार्ड वर मोफत साडी? कधी मिळणार
ई-केवायसी नसेल केली तर कार्ड होऊ शकतं रद्द!
सरकारनं नुकताच एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे दर ५ वर्षांनी रेशन कार्डसाठी ई-केवायसी करणं बंधनकारक आहे.