Agriculture Compensation News |राज्यामध्ये शेतकऱ्यांवरती मोठा संकटाचा कोसळला होता, सप्टेंबर महिन्यामध्ये सर्व शेतीचे नुकसान झालं, जनावरे वाहून गेली, हे सर्व झालं ते निसर्गाच्या लहरीपणामुळे. शेतकऱ्यांवरती अतिवृष्टी, पूर अशा हवामान बदल्यामुळे मोठ्या प्रमाणात बिकट परिस्थिती निर्माण होती. हीच परिस्थिती सप्टेंबर महिन्यामध्ये निर्माण झाली होती काही ठिकाणी बियाणच राहिले नाही तर काही ठिकाणी शेती देखील राहिली नाही, आता काहीतरी सरकारने मदत करावी असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता व त्यावरती आता थोडासा दिलासा देणारा निर्णय आलेला आहे. Agriculture Compensation News
राज्य सरकारने अमरावती आणि छत्रपती संभाजी नगर विभागातील सहा जिल्ह्यांसाठी तब्बल 480 कोटी रुपयांच्या मदतीस मंजुरी दिली आहे. ही रक्कम थेट अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरू झाली असून अनेकांना पहिले हप्त्याचे संदेश मिळू लागलेले आहेत.
ही मदत मिळणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना आणि हिंगोली यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अमरावती विभागात सर्वाधिक विधी म्हणजे जवळपास 91 कोटी रुपये अकोल्याला आणि 289 एक कोटी रुपये बुलढाणासाठी वितरित केले जात आहे. तर वाशिम जिल्ह्यासाठी 34 कोटी जालना जिल्ह्यासाठी 83 लाख आणि हिंगोली साठी 64 कोटी 61 लाख रुपये असे मदत जाहीर झाली आहे. .
तर पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मदत व पुनर्विष्ण विभागाकडे हे प्रस्ताव पाठवण्यात आले आहे आणि अखेर त्या आधारे रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण पाच लाख 37 हजार हेक्टर वरील नुकसान झालेल्या पिकांसाठी सहा लाख 72 हजार हून अधिक शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. NDRF च्या निकषानुसार प्रति शेतकरी जास्तीत जास्त तीन हेक्टर क्षेत्रावर ही मदत लागू आहे.
गेल्या दोन महिन्यापासून काही भागात इतका जोरदार पाऊस पडला की पूर्ण पिकाच वाहून गेला आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन, मका, तुर, हे पीक सगळे जमीन दोस्त झाले. काही ठिकाणी जर शेतकऱ्यांचे घर देखील वाहून गेलं. परंतु या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळत आहे.
हे पण वाचा | जूनमध्ये या ७ राशींचा सोन्यासारखा काळ सुरू होणार..! पहा तुमची रास आहे का यामध्ये?