Astrology Today | मित्रांनो, शनी महाराज म्हणजे कर्मफळाचे दाता. माणसाने केलेल्या कर्मावर तेवढंच फळ देतात. म्हणूनच त्यांना न्यायाधीश ग्रह म्हटलं जातं. आता ऑक्टोबर २०२५ मध्ये शनी महाराज पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करतायत आणि यामुळे काही राशींचं नशीब खरंच उजळणार आहे. आतापर्यंत आयुष्यात अडचणी, संघर्ष आणि आर्थिक अडथळे आले असतील, पण आता शनी महाराजांची कृपा होऊन या लोकांवर पैशांचा वर्षाव होईल, सुख-समृद्धी मिळेल आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. Astrology Today
३ ऑक्टोबरच्या रात्री ९.४९ वाजता हा महत्त्वाचा बदल होतोय. पूर्वाभाद्रपदा नक्षत्र हा बृहस्पतीचा नक्षत्र असल्यामुळे शनीच्या या प्रवेशामुळे काही राशींवर खास कृपा होणार आहे. चला तर बघूया, कोणत्या ४ राशींवर शनी महाराज धनलाभाचा वर्षाव करणार आहेत.
कर्क राशी (Cancer)
कर्क राशीच्या लोकांना या काळात मोठा फायदा मिळणार आहे. शनी नवव्या भावात येत असल्यामुळे भाग्याची साथ लाभेल. नोकरीत नवीन संधी, व्यवसायात नफा, आणि गुंतवणुकीत चांगला फायदा मिळेल. ज्यांचं काही काळापासून अडकलेलं काम होतं, तेही आता पूर्ण होईल. घरात आनंदाचे क्षण येतील. दिवाळीच्या आधी कुटुंबासोबत सुखद वातावरणात वेळ घालवता येईल. शनी महाराजांच्या कृपेने कर्क राशीचे लोक धनधान्याने समृद्ध होतील.
तूळ राशी (Libra)
तूळ राशीसाठी तर सोन्याचा काळ सुरू होत आहे असं म्हणायला हरकत नाही. पैशांची कमतरता जाणवणार नाही. जर कुठे अडकलेले पैसे असतील, तर तेही या काळात परत मिळतील. व्यवसायात नवे व्यवहार हातात येतील आणि परदेशातूनही चांगला पैसा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना बढती आणि कौतुक मिळेल. घरगुती आयुष्यात समंजसपणा राहील, पती-पत्नीमध्ये जुळवाजुळव होईल. आरोग्याच्या मोठ्या समस्या टळतील आणि मानसिक शांती लाभेल.
कुंभ राशी (Aquarius)
कुंभ राशीवर शनी महाराजांची विशेष कृपा होणार आहे. आत्मपरीक्षण करून आयुष्यात योग्य दिशा ठरवता येईल. तुमचं बोलणं गोड आणि नम्र होईल, ज्यामुळे लोकांमध्ये लोकप्रियता वाढेल. परदेश प्रवासाची संधी मिळेल, नवे मित्र मिळतील आणि जुने संबंधही सुधारतील. कामात नवा उत्साह येईल आणि तुमचं व्यक्तिमत्त्व आणखी खुलून दिसेल.
मीन राशी (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. शनी महाराज लग्नभावात बसलेले असल्यामुळे आयुष्यातील सर्व योजना पूर्णत्वाला जातील. नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल, व्यापाऱ्यांना नवा नफा मिळेल, आणि राजकारण किंवा शासन क्षेत्रात असलेल्यांना मान-सन्मान मिळेल. समाजात तुमचं नाव होईल. ज्यांनी आजवर खूप मेहनत घेतली, त्यांना आता यशाचे फळ चाखायला मिळेल.
(Disclaimer | वरील दिली माहिती प्रसारमध्यमांच्या आधारे आहे. आम्ही कुठल्याही अंधश्रद्धेबाबत दुजारा देत नाही.)