Bank FD | दिवाळी संपली असली तरी, सर्वांनाच गुंतवणुकीचा येड आहे. काहीजण म्हणतात अरे आपल्याला तर दिवाळीमध्ये गुंतवणूक करायची होती. आता पुढच्या वर्षी गुंतवणूक करू, परंतु जर तुम्ही गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवायचा विचार करत असाल तर थोडं थांबा दिवाळी संपले असली तरी या बँकेच्या एफडीवर मिळत आहे भरघोस व्याज. जिथे तुम्ही शेअर बाजारासारखीच गुंतवणूक करून चांगला नफा मिळू शकता. खरंतर शेअर बाजारामध्ये मोठी जोखीम असते, चढ उतारा असतात कधी पैसे बुडतील कधी वाढतील सांगता येत नाही. सध्या देशात काही खास बँका ग्राहकांना चांगला परतवा देत आहे त्यातच एक म्हणजे इंडसइंड बँक. या बँकेच्या एफडीवर सध्या एवढे जबरदस्त व्याज मिळते की एकूण लोक थक्क झाले आहेत. Bank FD
इंडसइंड बँकेने आपल्या ग्राहकांसाठी विविध कालावधीच्या एफडी योजना जाहीर केलेले आहेत. साधारण एक वर्षापासून ते पाच वर्षापर्यंत तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता. सध्या बँक सामान्य ग्राहकांना 6.75 ते 6.90 टक्के व्याज देत, तर ज्येष्ठ नागरिकांना थेट 7.15 टक्केपर्यंत व्याज मिळत आहे. म्हणजे मोठी रक्कम गुंतवली तर म्युच्युरिटीच्या वेळी तुम्हाला लाखोंचा फायदा होणार आहे. Bank FD
उदाहरण घ्यायचे झाले तर, जर तुम्ही या योजनेमध्ये पाच वर्षाच्या मुदती साठी पाच लाख रुपये गुंतवले, त्याला 7.12 लाख रुपये परत मिळतात. म्हणजे 2.12 लाख रुपयांचा जबरदस्त परतावा.
ग्रामीण भागातील मध्यम वर्गीय लोकांसाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे आणि यांना आवडणारी देखील आहे. कोणतीही जोखीम नाही बँकेचा विश्वास आहे व्याजदरही आकर्षक आहे. जर तुम्हाला शेअर मार्केट शिवा पैसे गुंतवणूक करायचे असेल तर एफडी मध्ये ठेवले तर छान झोप लागते आणि पैसे देखील सुरक्षित राहतात.
इंडसइंड बँकेच्या एफडी योजनेमध्ये तुम्ही दोन-तीन वर्षाच्या कालावधीसाठी देखील निवड करू शकता. दोन वर्षासाठी पाच लाखांचे गुंतवणूक केली तर 73 हाजारांपेक्षा अधिक व्याज मिळते. तर तीन वर्षासाठी गुंतवणूक केल्यास 1 लाख 13 हाजारांपेक्षा अधिक परतावा मिळतो.
( Disclaimer : वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही. तर गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या.)
