या बँकेच्या खात्यावर मिळत आहे एफडी सारखं व्याज जाणून घ्या सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Fd Yojana : सध्याच्या घडीला प्रत्येक जणाला आपल्या पैशावर जास्त व्याज मिळवण्याची इच्छा असते. पण बऱ्याच वेळा आपण बँकेत ठेवलेले पैसे तसेच राहतात. सेविंग अकाउंट केवळ तीन ते चार टक्के व्याज मिळतं, यामुळे आपले पैसे वाढत नाहीत. पण आता एक अशी योजना आहे जिच्यामुळे सेविंग अकाउंट वर देखील तुम्हाला एफडी सारखं व्याज मिळणार आहे. ही योजना म्हणजे Sweep in Fd किंवा Auto Sweep Facility

ही सुविधा अशी आहे की तुमच्या सेविंग अकाउंटला थेट FD शी जोडलं जातं. उदाहरणार्थ, जर तुमच्या खात्यामध्ये एक लाख रुपये असतील आणि बँकेने AUTO SWEEP LIMIT 50000 ठरवली असेल, तर उरलेले पन्नास हजार रुपये आपोआप एफडी मध्ये रूपांतर होतील. म्हणजे तुम्हाला त्यावर सेविंगच्या तीन ते चार ऐवजी सहा ते सात पर्यंत FD व्याज मिळेल. आणि जेव्हा तुम्हाला पैसे लागतील, तेव्हा बँक त्या FD चा तेवढा भाग तोडून तुमच्या खात्यात ट्रान्सफर करते म्हणजे पैशावर व्याजही मिळतं आणि गरजेचे वेळी पैसेही त्वरित उपलब्ध राहतात. Bank Fd Yojana

तसेच या योजनेचा सर्वोत्तम फायदा म्हणजे जोखीम मुक्त आणि सुरक्षित गुंतवणूक आहे. बँकेच्या हमीसह FD सारखा व्याज मिळत आणि त्याचवेळी लिक्विडिटी कायम राहते. म्हणजे तुमचे पैसे कुठेही अडकत नाहीत. अनेक लोकांना ही स्कीम अगदी उपयोगाची वाटत आहे कारण त्यांना दैनंदिन व्यवहारसह व्यास देखील मिळत आहे.

सध्या ही योजना स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आय सी आय सी आय बँक, कोटक महिंद्रा बँक, आणि Axis या प्रमुख बँका सुविधा देतात. काही बँकांमध्ये ऑटो स्विफ्ट लिमिट 25 हजारापासून ५० हजारापर्यंत असते. तर एफडी ची मुदत साधारण ते एक ते पाच वर्षे दरम्यान ठेवली जाते. प्रत्येक बँकेचे नियम आणि व्याजदर वेगवेगळे असतात त्यामुळे खाते उघडण्यापूर्वी बँकेचे अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्व माहिती तपासा.

उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या खात्यात एक लाख रुपये रक्कम आहे, आणि त्यातील पन्नास हजार रुपये एफडी मध्ये बदल केले, तर तुम्हाला त्या रकमेला वर्षभरात साधारण तीन हजार दोनशे पन्नास रुपये पर्यंत व्याज मिळू शकतात. म्हणजे पैसा निष्क्रिय पडून राहण्याऐवजी रोज वाढत राहतो.

ही योजना विशेषतः मध्यमवर्गीय आणि नोकरदार लोकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कारण त्यांना दर महिन्याला पगार तारखेला मोठी रक्कम खात्यामध्ये जमा होते आणि काही दिवसात खर्चानंतर बॅलन्स कमी होतो. Sweep in एफडीमुळे ते पैसे काही दिवस जरी खात्यात असले तरी त्यावर एफडी सारखं व्याज मिळत राहते. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या तसेच ज्या योजनेत गुंतवणूक करणार आहे त्याची सविस्तर माहिती पहा.

Leave a Comment

error: Content is protected !!