या बँकेवर RBI चे कडक निर्बंध! खातेदारांना सहा महिने पैसेही काढता येणार नाहीत  महिलांचे लाडकी बहीणचे पैसे अडकले 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank news July 2025 | मुंबईतल्या लाखो सामान्य खातेदारांसाठी एक हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या भवानी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) थेट निर्बंध लादले असून, यापुढे सहा महिने या बँकेच्या खातेदारांना आपलेच पैसेही काढता येणार नाहीत. Bank news July 2025

हे पण वाचा | कोणती बँक देत नाही कर्ज! करा फक्त एक काम आणि पाच मिनिटात मिळणार तुम्हाला कर्ज 

हे निर्बंध 4 जुलै 2025 पासून लागू करण्यात आले असून, पुढील आदेश येईपर्यंत ते कायम राहणार आहेत. बँकेची आर्थिक स्थिती सतत ढासळत चालल्यामुळे आणि खातेदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे.

खातेदार हवालदिल, बँकेबाहेर गर्दीचा गोंधळ

दादर पश्चिम येथील शाखेबाहेर मोठ्या प्रमाणावर खातेदारांची गर्दी पाहायला मिळाली. काहींना मुलीचं हॉस्पिटल भरायचं होतं, काहींना वृद्ध आईसाठी औषधं घ्यायची होती  पण बँकेकडून मिळालेलं उत्तर एकच  “आदेश आहे, पैसे देता येणार नाहीत.”

घाटकोपर येथील मुख्य कार्यालयात फोनवरून माहिती मिळवणंही कठीण झालं आहे. बँकेचे कर्मचारी खुलासे टाळत असून, खातेदारांच्या प्रश्नांना “वरून ऑर्डर आहे” हे एकमेव उत्तर दिलं जात आहे.

RBI ची कारवाई कशामुळे झाली?

बँकेच्या आर्थिक स्थितीत गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घसरण होत होती. खातेदारांच्या ठेवींवर परतावा वेळेवर देणं कठीण होऊ लागलं होतं. आरबीआयने बँकेच्या संचालक मंडळासह अनेक वेळा चर्चा करून सुधारणा सुचवल्या होत्या. मात्र या सूचनांचे पालन करण्यात भवानी बँक अपयशी ठरली.

हे पण वाचा | कोणती बँक देत नाही कर्ज! करा फक्त एक काम आणि पाच मिनिटात मिळणार तुम्हाला कर्ज 

बँकिंग परवाना रद्द नाही, पण…

या निर्बंधामुळे भवानी सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आलेला नाही. म्हणजेच बँक अधिकृतरीत्या बंद झालेली नाही. पण खातेधारक काहीही आर्थिक व्यवहार करू शकत नाहीत.

जर बँकेची आर्थिक स्थिती पुढील काळात सुधारली, तर RBI हे निर्बंध शिथिल करू शकते किंवा पूर्णपणे रद्दही करू शकते.

लाडकी बहीण योजनेचे पैसेही अडकले!

या निर्बंधांमुळे अनेक महिलांचे ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसेही बँकेत अडकले आहेत.

दादरमधील एका महिलेने अश्रू अनावर करत सांगितलं, “माझे लाडकी बहीण योजनेचे पाच हजार रुपये भवानी बँकेत जमा आहेत. मला औषधांसाठी ते पैसे लागले होते. पण बँकेत सांगितलं की आता पैसे काढता येणार नाहीत. माझ्यासारख्या सामान्य महिलेचं कोण ऐकणार?

हे पण वाचा | FD करण्याचा विचार करीत असाल तर! या 6 बँकेमध्ये करा गुंतवणूक पैसे होणार डबल

या प्रकारामुळे बँकेतील खातेदारांमध्ये मोठी अस्वस्थता आणि नाराजी आहे.

सहकारी बँकिंग व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

भवानी बँकेसारख्या सहकारी बँका ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या आर्थिक आधारस्तंभ असतात. शेतकरी, महिला बचतगट, मध्यमवर्गीय नोकरदार  यांचं पूर्ण आर्थिक विश्व अशा बँकांवर अवलंबून असतं.

पण आर्थिक शिस्तीचा अभाव, व्यवस्थापनातील गोंधळ आणि नियोजनशून्य कर्जवाटप या सर्व गोष्टींमुळे बँका डबघाईला जातात.

शेवटी एकच सवाल  जबाबदार कोण?

सामान्य माणसाने मेहनतीनं साठवलेला पैसा असा अडकतो, तेव्हा त्याच्या काळजावर घाव बसतो. बँकेचं दुर्लक्ष, संचालक मंडळाचं अपयश आणि व्यवस्थापनाचा अकार्यक्षमपणा याला जबाबदार असेल, तर शिक्षा भोगावी ती सामान्य माणसाने?

RBI ने उचललेलं पाऊल खातेदारांच्या संरक्षणासाठी असलं तरी  हक्काचे पैसे अडकलेले हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही.

हे पण वाचा | FD करण्याचा विचार करीत असाल तर! या 6 बँकेमध्ये करा गुंतवणूक पैसे होणार डबल

Leave a Comment