Beneficiary Status: देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 19 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत जमा होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहार मधील भागलपुर या ठिकाणावरून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा करणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्यासाठी देशातील 9.7 कोटी शेतकऱ्यांना एकूण 22 हजार कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम दिले जाणार आहे. या 9.7 कोटी शेतकऱ्यांपैकी 2.41 कोटी महिला शेतकरी आहेत.
हे पण वाचा | मोठी बातमी! 28 फेब्रुवारी आधी करून घ्या हे काम अन्यथा बंद होणार रेशन कार्ड
प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. हा निधी तीन समान हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना महाडीबीटी द्वारे दिला जातो. म्हणजे दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयाचा हप्ता जमा केला जातो. या योजनेअंतर्गत 18 वा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. त्यानंतर आता 24 फेब्रुवारी रोजी म्हणजे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 वा हप्ता जमा केला जाणार आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या आता 9.7 कोटी एवढी झाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. या योजनेअंतर्गत 19 वा हप्ता दिल्यानंतर आतापर्यंत शेतकऱ्यांना एकूण 3.68 लाख कोटी रुपये मिळतील.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का नाही ये तपासणी आवश्यक आहे. त्याचबरोबर लाभार्थी शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्माननिधी योजनेची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे का नाही हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे. कारण लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जात नाही. त्यामुळे तुम्ही या योजनेची ई-केवायसी केली आहे का नाही हे तपासून घ्या. Beneficiary Status
हे पण वाचा | मोठी खुशखबर! महिलांना मिळणार रेशन कार्ड वर मोफत साडी? कधी मिळणार
तुमच्या खात्यात पैसे आले का नाही कसे तपासावे?
तुमच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याचे दोन हजार रुपये आले का नाही तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर पीएम किसान पोर्टल दिसेल. या ठिकाणी तुम्हाला फार्मर कॉर्नर (farmers corner) या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर आता अनेक पर्याय उपलब्ध होतील. त्यातील तुम्हाला नो युवर स्टेटस ( know your status) या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आता तुमच्या स्क्रीनवर उघडलेल्या पेजच्या वरच्या बाजूला नो युआर रजिस्ट्रेशन नंबर (know your registration number) या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आता यानंतर तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा नंबर वर एक ओटीपी प्राप्त होईल तो न चुकता भरायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक मिळेल. आता नवीन पेजवर नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर आणि कॅप्चर कोड एंटर करा आणि गेट डाटा या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर पी एम किसान योजनेच्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती दिसेल.
हे पण वाचा | FD करण्याचा विचार करीत असाल तर! या 6 बँकेमध्ये करा गुंतवणूक पैसे होणार डबल
पीएम किसान योजनेचे पैसे नाहीतर काय करावे?
जर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 19 व्या हप्त्याचे पैसे मिळाले नाही तर. तुम्ही या योजनेसंबंधीतील टोल फ्री नंबर वर कॉल करून याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला या क्रमांकावर 155261, 1800115526 किंवा 011-26681092 कॉल करून तक्रार करू शकतात. तुम्ही www.pmkisan-ict@gov.in यावर मेल करून तक्रार देखील करू शकतात.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
2 thoughts on “9 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 19 व्या हप्त्याचे 2,000 रुपये”