Best cars under 10 lakh : GST मध्ये झालेल्या ऐतिहासिक कपातीमुळे आता पुन्हा एकदा ऑटोमोबाईल्स मार्केटमध्ये धुमाकूळ सुरू झाला आहे. इतकंच काय तर टाटा ,मारुती सुझुकी, महिंद्रा, यासारख्या दिग्गज कंपन्यांच्या छोट्या गाड्यांच्या किमती इतक्या कमी झाल्या आहेत की तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही. यापूर्वी चार मीटर पेक्षा कमी लांबीच्या गाड्यांवर 28% जीएसटी भरावा लागत होता परंतु आता केंद्र सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे हा फक्त 18% भरावा लागणार आहे. आणि बाजारात एकच खळबळ उडाली आहे की अनेक कार च्या किमतीमध्ये 70 ते 80 हजार रुपयाची कपात झाली आहे.
आता जर तुम्ही दिवाळी निमित्त नवीन कार घेण्याचा विचार करीत असाल तर, आज आम्ही तुम्हाला बजेटमध्ये येणाऱ्या कारची माहिती देणार आहोत. ही कार 10 लाखाच्या आत असेल आणि टाटा मोटर्स वर तुम्ही विश्वास ठेवीत असाल तर हा लेख तुमच्यासाठी खास राहणार आहे. अनेक वेळा तुम्ही कार्स घेण्याचा विचार केला असेल परंतु शोरूम मध्ये गेल्यानंतर गोंधळून जातात, कोणती कार घ्यावी ? कोणती बेस्ट आहे? किंमत किती असेल? असे अनेक प्रश्न उभे राहतात.
पण आज मी तुम्हाला थेट तुम्हाला दहा लाखाच्या आत मध्ये असलेल्या बजेट कारची माहिती सांगणार आहे. यामध्ये टाटा मोटरच्या टॉप सहा गाड्या कोणत्या आहेत व सात लाखाच्या आत तुम्हाला कशी मिळणार आहे आणि या कार्स कोणत्या नागरिकांसाठी योग्य राहणार आहे.
टाटा मोटरच्या टॉप 6 बजेट मध्ये असणाऱ्या गाड्या !
- Tata Curvv

गाडीची किंमत 6.65 लाख रुपये आहे. नव्या लूकची आणि एसीव्ही स्टाईल ची गाडी हवी असेल तर ही गाडी मध्यवर्गी लोकांसाठी अगदी फिट बसणार आहे.
- Nexon

या गाडीची किंमत ही 6.32 लाख रुपये किती राहणार आहे. ही गाडी म्हणजे सुरक्षा आणि पावर चा परफेक्ट संगम शहरांमधील नागरिकांसाठी ही गाडी बेस्ट राहणार आहे.
- Altroz

ही गाडी तुम्हाला 6.30 लाखांमध्ये मिळणार आहे, लोक आणि मायलेज या दोन्हीचा छान कॉम्बिनेशन, तरुण मंडळी आणि ऑफिस कर्मचाऱ्यांसाठी अगदी परफेक्ट कार
- Punch

या गाडीची किंमत 5. 49 लाख रुपये, या गाडीचा छोटा पण दमदार असा SUV टाइप लुक असलेला कार मॉडेल गावा ठिकाणी भारी दिसतो.
- Tiago

या गाडीची किंमत 5.48 लाख रुपये इतकी आहे, फॅमिली कार हवी पण बजेट कमी असेल तर ही गाडी तुमच्यासाठी योग्य राहणार आहे.
आजवर आपण घर बांध सोन खरेदी करणे शेतीसाठी ट्रॅक्टर घेणे, अशा गोष्टीचा योग्य काळ साधून घेतो पण कार खरेदीचा योग्य कार साधण्याची वेळ आली आहे. GST कमी झाला आहे टाटा मोटरच्या किमती घसरले आहेत आणि दिवाळी सारख्या शुभ मुहूर्तावर जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर तुमच्यासाठी हे पाच पर्याय उत्तम राहणार आहेत.
Disclaimer :
वरील लेखामध्ये दिलेल्या किमती या फक्त एक्स शोरूम अंदाजीत किमती आहेत. जीएसटी कपात, राज्यनिहाय कर, विमा, आरटीओ फी, इत्यादीमुळे प्रत्यक्षर अनुसार ऑन रोड किमती वेगळे असू शकतात. कोणताही खरेदी निर्णय घेण्यापूर्वी आपल्या जवळचे अधिकृत डीलरशिप मध्ये जाऊन संपर्क करावा किमती आणि ऑफरची खात्री करून घ्यावी.