Business idea | मित्रांनो गावातच राहून तुम्हाला एखादा स्थिर उत्पन्न देणारा व्यवसाय करायचा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक सोनेरी उद्योग बद्दल माहिती देणार आहोत. तो म्हणजे ‘डाळ मिल उद्योग’ हा व्यवसाय तुम्ही शेतीसोबत जोडधंदा म्हणून देखील करू शकता. हा व्यवसाय फक्त पैशाचाच नाही तर गावातच रोजगार निर्माण करणारा आणि स्थानिक विकासाला हातभार लावणार आहे. भारतीय लोकांच्या आहारात डाळ ही अति आवश्यक आहे. रोजच्या जेवणात डाळि शिवाय आपले ताट अपूर्ण वाटते. तुर मूक हरभरा मसूर या सगळ्यांना देशभरात आणि परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे आजच्या काळात डाळ मिल उद्योग खूप फायद्याचा ठरू शकतो. Business idea
डाळीचे वाढते दर मागणी आणि वापर वर्षभर असल्यामुळे हा व्यवसाय हंगामी नसून कायमस्वरूपी उत्पन्न देणार आहे. जर तुम्ही एकदा मिल सुरू केली तर पैसा मिळणे थांबणार नाही. फक्त योग्य नियोजन आणि वेळ देणे महत्त्वाचे ठरणार आहे. डाळ मिल सुरू करण्यासाठी जास्त जमिनीची आवश्यकता नाही. तुम्ही कुठेही एखाद्या गावात जिथे कच्चामाल (तूर, हरभरा, मूग इ.) सहज मिळतो आणि वाहतूक सुलभ आहे त्या ठिकाणी हा उद्योग सुरू करू शकता.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुमारे दोन ते पाच लाख रुपयाचे गुंतवणूक पुरेशी आहे. या पैशांमध्ये तुम्ही कच्चामाल, मशिनरी, वीज जोडणे, शेड, पॅकेजिंग साहित्य आणि कामगारांचे वेतन या सर्व गोष्टींचा समावेश करू शकतात. या व्यवसायासाठी तीन ते चार लोकांची टीम आवश्यक आहे. यामध्ये एक जण मशीन हाताळण्यासाठी तर एक जण पॅकिंगसाठी आणि दोन लोक माल उचलणे घेणे या कामासाठी आवश्यक आहे. या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एखाद्या छोट्या गावात देखील हा व्यवसाय सुरळीत चालू शकतात.
कर्ज आणि सरकारी मदतीचा फायदा
सरकारी बँकेतून किंवा खाजगी बँकेतून डाळ मिल उद्योगासाठी सहज कर्ज मिळते. यासोबतच सरकारच्या अशा काही योजना आहेत ज्या तुमचं काम अधिक सोपं करू शकतात.
मुख्यमंत्री ग्राम उद्योग योजना:— ग्रामीण भागात उद्योग सुरू करण्यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते.
राष्ट्रीय कृषी विकास योजना:— कृषी आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते.
MSME योजना:— लघु उद्योगासाठी कमी व्याजदरात कर्ज आणि सबसिडी सुविधा देखील दिली जाते.
जर तुम्ही सरकारच्या या योजनेचा योग्य फायदा घेतला तर अगदी कमी भांडवलामध्ये मोठा उद्योग उभा करू शकतात.
डाळ मिल साठी लागणारी मशिनरी
धान्याची चाडी: धान्याचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी.
रोलर: तुरीचे फोलपट वेगळे करण्यासाठी.
पंखा आणि चाळणी संच: डाळ आणि फोलपट वेगळे करून स्वच्छ डाळ तयार करण्यासाठी.
ऑगर कन्व्हेअर: तयार डाळीवर तेलाचा हलका थर देण्यासाठी.
लहान क्षमतेच्या मेलमध्ये ताशी १०० किलो डाळ तयार केली जाऊ शकते. खर्च सोमवारी 80,000 ते 1 लाख रुपयापर्यंत येतो. पण मोठ्या क्षमतेच्या मेल साठी खर्च चार ते पाच लाख रुपये पर्यंत येऊ शकतो.
तुम्ही तयार केलेले डाळ स्थानिक बाजारात किराणा दुकानांमध्ये हॉटेल्स सुपर मार्केट आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विकू शकता. स्वतःचा ब्रँड तयार केला तर तुमचा नफा डायरेक्ट दुप्पट होऊ शकतो. जर तुम्ही डाळ मिल सुरू केली तर केवळ तुम्हालाच नाही तर गावातील अनेक तरुणांना देखील याचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळतो आणि तरुणाला रोजगारांची संधी मिळते. हा छोटासा उद्योग संपूर्ण गावाला स्वभावलंबी बनवू शकतो.